मध्यप्रदेशातील करोडपती कॉनस्टेबल, ५ घरं, ६ भूखंडाचा मालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2015 11:04 AM2015-12-29T11:04:54+5:302015-12-29T13:21:52+5:30

हेड कॉनस्टेबलकडे पाच आलिशान घरे, सहा भूखंड, तीन गाडया, एक एसयूव्ही कार, १३२ ग्रॅम सोने आणि २ किलो चांदीचे दागिने इतकी संपत्ती असेल तर.

Madhya Pradesh's crorepatis constable, 5 houses, 6 landowners | मध्यप्रदेशातील करोडपती कॉनस्टेबल, ५ घरं, ६ भूखंडाचा मालक

मध्यप्रदेशातील करोडपती कॉनस्टेबल, ५ घरं, ६ भूखंडाचा मालक

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

इंदूर, दि. २९ - सरकारी नोकरी करणा-या हेड कॉनस्टेबलचे वेतन १० ते १५ हजार किंवा जास्तीत जास्त २० हजार रुपयांपर्यंत असू शकते. इतके वेतन असणा-या हेड कॉनस्टेबलची संपत्ती काही लाखांमध्ये असू शकते. 
पण हेड कॉनस्टेबलकडे पाच आलिशान घरे, सहा भूखंड, तीन गाडया, एक एसयूव्ही कार, १३२ ग्रॅम सोने आणि २ किलो चांदीचे दागिने इतकी संपत्ती असेल तर. संपत्तीचा आकडा पाहून चक्रावून गेलात ना. मध्यप्रदेशात जबलपूरमध्ये प्रादेशिक परिवहन विभागात नोकरी करणा-या हेड कॉनस्टेबल अरुण सिंह यांच्याकडे इतकी संपत्ती सापडली आहे.  
लोकायुक्त पोलिसांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे त्यांनी अरुण सिंहच्या इंदूर, रेवा आणि सतना येथील घरावर छापे मारले. त्यावेळी त्यांनी जमवलेल्या संपत्तीचा आकडा समोर आला. अरुण सिंह यांच्यावर बेहिशोबी मार्गाने संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्याआधारावर छापेमारीची कारवाई करण्यात आली. 
अरुण सिंहची तीन महिन्यांपूर्वी जबलपूरला बदली झाली होती. तेव्हापासून एकही दिवस ते कामावर आले नव्हते म्हणून जबलपूर आरटीओने भोपाळ कार्यालयाकडे त्यांच्या अनुपस्थितीची तक्रार केली होती. अरुण सिंह सेंधवा येथे कार्यरत असताना त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी मिळाल्या होत्या. ३२ वर्षांच्या सेवाकाळात अरुण सिंह यांना अंदाजित ५० लाख रुपये वेतन मिळाले असेल पण त्यांच्याकडे संपत्ती कोटयावधींची आहे. 

Web Title: Madhya Pradesh's crorepatis constable, 5 houses, 6 landowners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.