CoronaVirus मध्य प्रदेशमध्ये खळबळ! राज्य सभेसाठी मतदान करणारा भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 12:26 PM2020-06-20T12:26:28+5:302020-06-20T12:28:53+5:30
सकलेचा यांच्यासह त्यांच्या पत्नीला कोरोना झाल्याने मध्य प्रदेश सरकारमध्ये खळबळ उडाली आहे.
भोपाळ : ऐन कोरोनाच्या संकटात राज्यसभानिवडणूक घेतल्याने आता मध्य प्रदेशच्या आमदार आणि विधानसभेतील कर्मचाऱ्यांवर कोरोनाची टांगती तलवार आहे. मतदानासाठी आलेला भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे.
देशभरात काल राज्यसभेच्या 19 जागांवर काल मतदान घेण्यात आले. मध्य प्रदेशमध्येही राज्यसभेच्या तीन जागांवर मतदान झाले. या जागांवर भाजपाचे दोन आणि काँग्रेसचे एक उमेदवार जिंकले. भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह सोलंकी हे राज्यसभेवर जाणार आहेत. तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह हे राज्यसभेवर गेले आहेत.
दरम्यान या मतदानासाठी पटनामध्ये आलेले भाजपाचे जावद मतदारसंघाचे आमदार ओमप्रकाश सकलेचा हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे.
सकलेचा यांनी सांगितले की, गुरुवारी त्यांच्या पत्नीला ताप आला होता. यामुळे त्यांनी दोघांचीही चाचणी भोपाळच्या एका खासगी लॅबमध्ये केली होती. या चाचणीचा रिपोर्ट शुक्रवारी रात्रीच पॉझिटिव्ह आला आहे. याच दिवशी राज्यसभेचे मतदान झाले. जावद विधानसभा मतदारसंघ नीमच जिल्ह्यात येतो. सकलेचा हे 16 जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी भोपाळमध्ये आले होते.
सकलेचा यांच्यासह त्यांच्या पत्नीला कोरोना झाल्याने मध्य प्रदेश सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी त्यांच्या संपर्कात कोणकोण आमदार, पक्षाचे पदाधिकारी आले होते, त्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच त्यांच्या आमदार निवासातील लोकांनाही तपासले जाणार आहे. विधानसभेतील कर्मचारी अधिकारी त्यांच्या संपर्कात आले होते का याचाही शोध घेतला जाणार आहे.
Madhya Pradesh: A BJP MLA who had participated in voting for Rajya Sabha elections yesterday has tested positive for #COVID19.
— ANI (@ANI) June 20, 2020
सकलेचा यांचे जावदमधील निवासस्थान आधीपासूनच कन्टेन्मेंट झोनमध्ये येते. कोरोनामुळे ते गेल्या काही दिवसांपासून दूर असलेल्या फार्महाऊसवर राहत होते. सकलेचा हे अनेक लोकांना भेटले होते. तसेच राज्यसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या पक्षाच्या बैठकीलाही उपस्थित होते. सकलेचा पॉझिटव्ह असल्याचे समजताच सचिवालयाने राज्यसभा निवडणुकीवेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले आहेत. सकलेचा तीनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. तिन्ही वेळा कमी मतफरकाने ते जिंकले आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
वाद मिटला! राजू शेट्टी यांच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा मार्ग मोकळा
अंकिता, तूच सुशांतला वाचवू शकली असतीस, पण...; मित्राची भावनिक पोस्ट
मोदींनी भारताची जमीन चीनला देऊन टाकली; राहुल गांधी यांचा आरोप
CoronaVirus: होम आयसोलेशनवरून केंद्र सरकारने राज्यांना झापले; नियम बदलले...
भारताला मोठे यश! 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला वेग; अमेरिकेत अटक
आजचे राशीभविष्य - 20 जून 2020; मिथुन राशीच्या लोकांना आजार, अपघाताची शक्यता