मोदींवरील पोस्ट पडली महागात, वर्षभर सोशल मीडियापासून दूर राहण्याची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 11:06 AM2019-11-06T11:06:39+5:302019-11-06T11:08:11+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो एडिट करून फेसबुकवर शेअर करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे.

madras high court asks to stay away from social media for 1 year to the person who posted morphed picture of pm modi on fb | मोदींवरील पोस्ट पडली महागात, वर्षभर सोशल मीडियापासून दूर राहण्याची शिक्षा

मोदींवरील पोस्ट पडली महागात, वर्षभर सोशल मीडियापासून दूर राहण्याची शिक्षा

Next
ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो एडिट करून फेसबुकवर शेअर करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. वर्षभर सोशल मीडियापासून दूर राहण्याची शिक्षा देण्यात आली आहे. सोशल मीडियावर जबीनने एक महिन्यापूर्वी एक पोस्ट शेअर केली होती.

कन्याकुमारी - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो एडिट करून फेसबुकवर शेअर करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. या व्यक्तीला आता वर्षभर सोशल मीडियापासून दूर राहण्याची शिक्षा देण्यात आली आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यात राहणाऱ्या जबीन चार्ल्स याने मोदींचा फोटो एडिट करून फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्ट केल्याच्या एक महिन्यानंतर मद्रास हायकोर्टाने जबीनला वर्षभर सोशल मीडियापासून दूर राहावं लागणार असल्याचं सांगितलं आहे. 

जबीन अंतरिम जामीन मिळवण्यासाठी मद्रास हायकोर्टात गेला होता. पुढचं एक वर्ष सोशल मीडियापासून दूर राहू, असं प्रतिज्ञापत्र त्याने कोर्टासमोर सादर केल्याची माहिती मिळत आहे. जस्टिस जी. आर. स्वामिनाथन यांनी जबीन याने कोर्टात लेखी माफीनामा द्यावा. जबीन सोशल मीडिया वापरताना आढळून आला तर त्याचा जामीन रद्द केला जाईल असं सांगितलं आहे. सोशल मीडियावर जबीनने एक महिन्यापूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. यानंतर भाजपा पदाधिकारी नांजिल राजा यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती आणि हे प्रकरण थेट कोर्टापर्यंत पोहोचलं. 

जबीन चार्ल्स याने हायकोर्टात सार्वजनिक मंचावर आपलं मत व्यक्त करणं गुन्हा नसल्याचं सांगितलं. त्यानंतर जबीनने स्वतः हून ही पोस्ट डिलीट केली आणि पंतप्रधानांचा अवमान करणं योग्य नसल्याचंही मान्य केलं. तसेच स्थानिक वृत्तपत्रात जाहीर माफीनामा प्रसिद्ध करण्यास तयार असल्याचंही जबीनने सांगितलं. कन्याकुमारीमधील वाडसरी पोलिसांनी जबीनविरोधात 11 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला होता. 

दिल्लीमध्ये प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या पातळीमध्ये गेल्या तीन वर्षातील उच्चांकी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे वायू प्रदूषण लवकरात लवकरत आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर उत्तर भारतातील वायू प्रदुषण वाढण्यास माझ्यासह आपण सर्वच या परिस्थितीला जबाबदार आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाब, हरयाणा या राज्यातील मुख्यमंत्र्यांची एकत्र बैठक बोलवावी अशी विनंती करण्यासाठी मी पंतप्रधानांची भेट घेतली असल्याचे हरभजनने सांगितले. दिल्ली आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी हवेतील प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून वर गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील परिस्थिती जैसे थे आहे. दिल्ली सरकारने आजपासून खासगी गाड्यांसाठी सम-विषम योजना लागू केली आहे. 

Web Title: madras high court asks to stay away from social media for 1 year to the person who posted morphed picture of pm modi on fb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.