चेन्नईत कुत्र्यांचं रक्तदान शिबीर, मद्रास व्हेटर्निटी कॉलेजचा अनोखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 08:40 AM2018-10-30T08:40:41+5:302018-10-30T08:45:32+5:30
चेन्नईत सोमवारी (29 ऑक्टोबर) कुत्र्यांचं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या चेन्नईतील मद्रास व्हेटर्निटी कॉलेजतर्फे प्राण्याच्या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.
चेन्नई - माणसांसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन हे अनेक ठिकाणी करण्यात येत असतं. मात्र चेन्नईत सोमवारी (29 ऑक्टोबर) कुत्र्यांचं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या चेन्नईतील मद्रास व्हेटर्निटी कॉलेजतर्फे प्राण्यांच्या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरात जवळपास 50 कुत्र्यांचा सहभाग होता.
Chennai: Tanuvas Animal Blood Bank, department of clinics, Madras Veterinary College yesterday conducted a voluntary dog blood donation camp on its campus. As many as 50 dogs were present at the blood donation camp. #TamilNadupic.twitter.com/7bpmdvjxMj
— ANI (@ANI) October 29, 2018
कुत्र्यांच्या रक्तदान शिबिरात गोळा केलेलं रक्त तनुवास रक्तपेढीमध्ये साठवलं जाणार आहे. रक्तदान केलेल्या कुत्र्यांना डोनर कार्डही देण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात 50 कुत्र्यांनी सहभाग घेतला असून 11 कुत्र्यांनी रक्तदान केलं. प्राण्यांना रक्ताची गरज असल्यास ब्लड बँक असावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. पाळीव प्राण्यांना काही इजा झाली किंवा रक्ताची आवश्यकता भासली तर ते या रक्ताचा वापर करू शकणार आहे.