‘पाळत ठेवण्यापेक्षा माेदींनी काम करावे’, केजरीवालांनी साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 10:55 AM2022-11-27T10:55:41+5:302022-11-27T10:56:05+5:30
कथित अबकारी धोरण घोटाळ्यासंबंधी सात आरोपींविरोधात सीबीआयने आरोपपत्र न्यायालयात शुक्रवारी दाखल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास लक्ष ठेऊन होते. खोट्या गुन्ह्यांमध्ये आपच्या नेत्यांना अडकविण्याऐवजी त्यांनी देशासाठी दोन तास काम करावे, असा सल्ला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला.
कथित अबकारी धोरण घोटाळ्यासंबंधी सात आरोपींविरोधात सीबीआयने आरोपपत्र न्यायालयात शुक्रवारी दाखल केले. यात उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या नावाचा उल्लेख नाही. याचा अर्थ सीबीआयने सिसोदिया यांना निर्दोष ठरविलेले आहे.