याच महिन्यात घरोघरी मॅगी!

By admin | Published: November 5, 2015 12:24 AM2015-11-05T00:24:09+5:302015-11-05T00:24:09+5:30

बस्स, दो मिनिटं, म्हणत लहानथोरांच्या जिभेवर रेंगाळणारी मॅगी नुडल्सची चव याच महिन्यात पुन्हा चाखायला मिळणार आहे. मॅगी खाण्यासाठी १०० टक्के सुरक्षित असून

Maggie house this month! | याच महिन्यात घरोघरी मॅगी!

याच महिन्यात घरोघरी मॅगी!

Next

नवी दिल्ली : बस्स, दो मिनिटं, म्हणत लहानथोरांच्या जिभेवर रेंगाळणारी मॅगी नुडल्सची चव याच महिन्यात पुन्हा चाखायला मिळणार आहे. मॅगी खाण्यासाठी १०० टक्के सुरक्षित असून याच महिन्यात मॅगी नुडल्स किरकोळ दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील, असे नेस्ले कंपनीने स्पष्ट केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नेस्लेच्या नानजानगुड(कर्नाटक), मोगा(पंजाब) आणि बिछोलीम (गोवा) येथील कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या मॅगी नुडल्सचे सर्व नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्व चाचण्यांमध्ये मॅगी नुडल्स यशस्वी ठरली आहे. मॅगी खाण्यासाठी १०० टक्के सुरक्षित असल्याचा अहवाल आम्हाला मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्यानंतर आता याच महिन्यात मॅगी नुडल्स मसाला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे नेस्लेने बुधवारी स्पष्ट केले.

Web Title: Maggie house this month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.