लोखंडाच्या भंगारापासून बनविली राम मंदिराची भव्य प्रतिकृती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 07:00 AM2023-11-27T07:00:57+5:302023-11-27T07:01:13+5:30
Ayodhya Ram Mandir: देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदौरमध्ये २१ टन लोखंडी भंगाराचा वापर करून राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ही प्रतिकृती अयोध्येत बांधल्या जात असलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती आहे.
देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदौरमध्ये २१ टन लोखंडी भंगाराचा वापर करून राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ही प्रतिकृती अयोध्येत बांधल्या जात असलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती आहे. विशेष म्हणजे या प्रतिकृतीच्या उभारणीत हिंदूंसह मुस्लीम कारागिरांचाही सहभाग आहे. शहराचे महापौर पुष्यमित्र भार्गव म्हणाले की, ही प्रतिकृती प्रभू रामाचा संदेश तसेच इंदौरच्या स्वच्छतेचा संदेश जगभर पोहोचवेल. ही प्रतिकृती कचरा व्यवस्थापनाच्या ‘३आर’ (रिड्यूस, रियूज आणि री-सायकल) सूत्रावर आधारित आहे.
४० फूट लांब
२७ फूट रुंद
२४ फूट उंच
२१ टन लोखंडी भंगार यासाठी वापरले असून, यात विद्युत खांब, वाहने आदींचे लोखंडी भंगार आहे.
६०-७० लाख रुपये खर्च यासाठी अपेक्षित असून, रंगरंगोटी आणि विद्युत सजावटीचे अंतिम काम बाकी आहे.