Mahakumbh Fire: महाकुंभमध्ये तिसऱ्यांदा आग लागली, वेळेवर अग्निशमन दल पोहोचले, मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 11:51 IST2025-02-07T11:47:30+5:302025-02-07T11:51:07+5:30
Mahakumbh Fire: प्रयानराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची घटना समोर आली.

Mahakumbh Fire: महाकुंभमध्ये तिसऱ्यांदा आग लागली, वेळेवर अग्निशमन दल पोहोचले, मोठा अनर्थ टळला
Mahakumbh Fire ( Marathi News ): महाकुंभमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची घटना समोर आली आहे. महाकुंभ परिसरातील शंकराचार्य मार्गावरील सेक्टर-१८ मध्ये आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी वेळीच दाखल झाल्या आहेत. गुरुवारी मेळा परिसरातील सेक्टर ८ मध्ये असलेल्या भ्रष्टाचार विरोधी संघटनेच्या कॅम्पमध्ये अचानक आग लागली. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवू शकले तोपर्यंत एक तंबू जळून खाक झाला होता. नवप्रयाग पार्किंगमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली, ही आग लगेच अग्निशमन दलाने आटोक्यात आणली.
गुरुवारी मेळा परिसरातील सेक्टर ८ मध्ये असलेल्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या कॅम्पमध्ये अचानक आग लागली. अग्निशमन दल वेळेवर दाखल झाले त्यामुळे मोठा अनर्थ टळला पण, एक तंबू जळून खाक झाला होता. नवप्रयाग पार्किंग लॉटमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली, ते आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली.
महाकुंभ में एक बार फिर लगी आग...
— Vinay Saxena (@vinaysaxenaj) February 7, 2025
मेला क्षेत्र के शंकराचार्य मार्ग स्थित सेक्टर-18 में आग लग गई है। फायर ब्रिगेड की कई गाड़ियां मौके पर हैं। आग पर काबू करने की कोशिश जारी है। #MahaKumbh2025#mahakumbhfire#महाकुंभ2025pic.twitter.com/OqWbR3WWeD
याआधीही लागली होती भीषण आग
काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधीलप्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये भीषण आग लागली होती. ही आग सेक्टर १९ मधील अखिल भारती धर्मसंघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पमध्ये लागली होती, तिथून ही आग इतर भागात पसरली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे बरेच तंबू आणि त्यातील सामान जळून गेले. आगीचं कारण समजू शकलेलं नाही. यादरम्यान, गीता प्रेसच्या ट्रस्टींनी कुणीतरी बाहेरून ज्वालाग्राही वस्तू फेकली, त्यामुळे ही आग लागली, असा दावा केला आहे.