Mahakumbh Fire: महाकुंभमध्ये पुन्हा अग्नितांडव, आता जुना आखाड्याला लागली आग, १५ टेंट जळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:02 IST2025-01-30T15:59:16+5:302025-01-30T16:02:36+5:30
Prayagraj Mahakumbh Mela 2025 Fire: महाकुंभ मेळामध्ये पुन्हा एकदा आग लागली आहे.

Mahakumbh Fire: महाकुंभमध्ये पुन्हा अग्नितांडव, आता जुना आखाड्याला लागली आग, १५ टेंट जळाले
Mahakumbh Mela Fire:प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे. काही दिवसापूर्वी या मेळामध्ये मोठी आग लागल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा एकदा आग लागल्याची बातमी समोर आली आहे. चमनगंज झुंसीजवळील जुना आखाड्याच्या छावणीत लागलेल्या आगीत १५ तंबू जळून खाक झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेत १५ तंबू जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तात्काळ कळवण्यात आले. तेथे पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने अग्निशमन दलाला तंबूपर्यंत पोहोचण्यास अडचण आली. असे असूनही, अग्निशमन दल वेळेवर पोहोचले आणि कोणतीही मोठी दुर्घटना न होता आग आटोक्यात आणली.
अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रमोद शर्मा म्हणाले, "आज आम्हाला छतनाग घाट पोलीस स्टेशन परिसरातील १५ तंबूंमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. तात्काळ कारवाई करण्यात आली आणि आग आटोक्यात आणण्यात आली. हा एक अनधिकृत तंबू होता . परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महाकुंभमध्ये याआधीही दोनदा आगीच्या घटना घडल्या आहेत. महाकुंभमेळ्यातील सेक्टर २ मध्ये दोन गाड्यांना आग लागल्यानंतर गोंधळ उडाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
जूना अखाड़े के शिविर में आग, 15 टेंट जले pic.twitter.com/MoyPRrmlGA
— Shivam Yadav (@Shivam28Y1) January 30, 2025