महाकुंभाची सांगता; 45 दिवसांत 66 कोटी भाविकांचे त्रिवेणी संगमात पवित्र स्नान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 22:11 IST2025-02-26T22:05:53+5:302025-02-26T22:11:24+5:30

Mahakumbh 2025: आज महाशिवरात्रीच्या स्नानाने प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ 2025 ची सांगता झाली.

Mahakumbh 2025: 66 crore devotees take holy bath at Triveni Sangam | महाकुंभाची सांगता; 45 दिवसांत 66 कोटी भाविकांचे त्रिवेणी संगमात पवित्र स्नान...

महाकुंभाची सांगता; 45 दिवसांत 66 कोटी भाविकांचे त्रिवेणी संगमात पवित्र स्नान...

Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशची सांस्कृतिक राजधानी प्रयागराजमध्ये 45 दिवसांपासून पवित्र महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. आज महाशिवरात्रीच्या स्नानाने या महाकुंभाची सांगता झाली. इतर दिवसांप्रमाणे आजही कोट्यवधी भाविकांनी महाकुंभात येऊन त्रिवेणी संगमात स्नान केले. विशेष म्हणजे, आज आलेल्या भाविकांना भारतीय हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानांनी ‘महा सॅल्यूट’ दिला. सरकारी आकडेवारीनुसार, या 45 दिवसांत सुमारे 66 कोटी भाविकांनी त्रिवणणी संगमात पवित्र स्नान केले.

20 लाखांहून अधिक लोकांनी कल्पवास केला
यावेळी महाकुंभात 20 लाखांहून अधिक लोकांनी कल्पवास केला. हे सर्व कल्पवासी पौष पौर्णिमेच्या आधी येथे पोहोचले होते, तर सर्व नियम आणि आचरण पाळून मौनी अमावस्येपर्यंत महाकुंभात मुक्काम केला. या काळात लोकांनी आपला बराचसा वेळ भजन, कीर्तन आणि ध्यानात घालवला. मौनी अमावस्येलाच कल्पातील सर्व रहिवासी आपापल्या घरी गेले. त्यांच्यासोबतच ऋषी-मुनींचे सर्व 13 आखाडेही मौनी अमावस्येला स्नान करून निघून गेले.

50 हून अधिक देशांतून भाविक आले होते
महाशिवरात्रीला महाकुंभात स्नान करण्यासाठी दोन दिवस आधीच गर्दी जमू लागली होती. पहाटे साडेतीन वाजल्यापासून लोकांनी आंघोळ करण्यास सुरुवात केली. मेळा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, दुपारी 4 वाजेपर्यंत 1.32 कोटी भाविकांनी स्नान केले होते, तर 20 लाखांहून अधिक भाविक स्नानासाठी पुढे जाताना दिसत होते. यावेळी नेहमीप्रमाणे सर्वच घाटांवर मेळा प्रशासनाने भाविकांवर पुष्पवृष्टी केली. रिपोर्टनुसार, नेपाळ, भूतान व्यतिरिक्त अमेरिका, इंग्लंड, जपानसह 50 हून अधिक देशांतील लोक महाकंभात स्नान करण्यासाठी आले होते.
 

Web Title: Mahakumbh 2025: 66 crore devotees take holy bath at Triveni Sangam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.