Harsha Richariya : "मला टार्गेट केलं", हर्षा रिछारियावर महाकुंभ सोडण्याची वेळ; ढसाढसा रडत सांगितलं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:51 IST2025-01-17T10:51:03+5:302025-01-17T10:51:52+5:30
Harsha Richariya And Mahakumbh 2025 : हर्षा रिछारियाला सोशल मीडियावर सर्वात सुंदर साध्वीचा टॅगही देण्यात आला आहे. कुंभमधील ३० वर्षीय हर्षाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सर्वांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

Harsha Richariya : "मला टार्गेट केलं", हर्षा रिछारियावर महाकुंभ सोडण्याची वेळ; ढसाढसा रडत सांगितलं काय घडलं?
कुंभमेळ्याच्या सुरुवातीपासूनच हर्षा रिछारिया हे नाव जोरदार चर्चेत आहे. हर्षा रिछारियाला सोशल मीडियावर सर्वात सुंदर साध्वीचा टॅगही देण्यात आला आहे. कुंभमधील ३० वर्षीय हर्षाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सर्वांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक लहान-मोठ्या माध्यमांनी तिची मुलाखत घेतली ज्यामध्ये तिला विचारण्यात आलं की तिने साध्वी होण्याचा निर्णय का घेतला? या प्रश्नाचं उत्तर देताना तिने सांगितलं की, ती साध्वी झालेली नाही.
महाकुंभात प्रवेश करताना हर्षा निरंजनी आखाड्याच्या रथावर बसलेली देखील दिसली होती. यावरून वाद सुरू झाला. काही संतांनी हर्षाच्या रथावर बसण्यावर आणि भगवे कपडे परिधान करण्यावर आक्षेप घेतला. हा वाद इतका वाढला आहे की, हर्षा रिछारियाने ढसाढसा रडत महाकुंभ सोडण्याची घोषणा केली आहे.
हर्षाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट X वर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत, हर्षा रिछारियाने महाकुंभ सोडण्यामागे कोणती कारणं दिली आहेत ते जाणून घेऊया...
यही सत्य है
— Harsha (@Host_harsha) January 16, 2025
जब जब एक महिला अपने जीवन में कुछ अलग करती है तो समाज के कुछ लोग बढ़ने नहीं देते
बाकी प्रभु इच्छा
हर हर महादेव.................@newscooponline#harsha#viralsadhvi#host_harsha#harshasquad#trending#viralvideo#mahakumbh2025#prayagraj#sanatan#hindu#mahadevpic.twitter.com/4fYrJYL6Jv
व्हिडिओमध्ये हर्षा म्हणत आहे की, लोकांना लाज वाटली पाहिजे की, जी मुलगी धर्माशी जोडण्यासाठी, धर्माबद्दल जाणून घेण्यासाठी, सनातन संस्कृती समजून घेण्यासाठी आली होती, तिला तुम्ही संपूर्ण कुंभमेळ्यात राहण्याच्या स्थितीतही सोडलं नाही. तो कुंभ जो आपल्या आयुष्यात एकदाच येतो. तुम्ही हा कुंभ एका व्यक्तीकडून हिसकावून घेतला आहात. मला पुण्याबाबत माहीत नाही, पण आनंद स्वरूपजींनी जे काही केलं त्याचं पाप त्यांना नक्कीच लागेल.
हर्षा पुढे म्हणाली की, येथील काही लोकांनी मला संस्कृतीशी जोडण्याची संधी दिली नाही. माझी नेमकी चूक काय आहे?, मला टार्गेट केलं जात आहे. अशा परिस्थितीत, २४ तास या कॉटेजला पाहण्यापेक्षा मी येथून निघून जाणं माझ्यासाठी चांगलं आहे.
हर्षा रिछारिया कोण आहे?
३० वर्षीय हर्षा रिछारिया ही उत्तराखंडची आहे. तिचं मूळ घर मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आहे. आपल्या इन्स्टाग्राम पेजवर, हर्षाने स्वतःचे वर्णन एक अँकर, मेकअप आर्टिस्ट, सामाजिक कार्यकर्ती, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून केलेलं आहे. कुंभमेळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आहे.