अंतिम अमृतस्नानास महाकुंभात महागर्दी; प्रयागराजमध्ये आतापर्यंत ६० कोटी भाविकांचे केले महास्नान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 05:49 IST2025-02-23T05:49:27+5:302025-02-23T05:49:45+5:30

१४४ वर्षांनंतर आलेल्या या महाकुंभ मेळ्याचे आता अवघे चार दिवस उरले आहेत. यामुळे भाविकांची गर्दी वाढली असून, शहरात येणाऱ्या सर्व बाहेरून येणारी वाहने थांबवली जात आहेत. 

Mahakumbh for the final bath of Amritsnan; 60 crore devotees have taken the bath in Prayagraj so far | अंतिम अमृतस्नानास महाकुंभात महागर्दी; प्रयागराजमध्ये आतापर्यंत ६० कोटी भाविकांचे केले महास्नान 

अंतिम अमृतस्नानास महाकुंभात महागर्दी; प्रयागराजमध्ये आतापर्यंत ६० कोटी भाविकांचे केले महास्नान 

प्रयागराज : महाकुंभच्या ४१व्या दिवशी शनिवारी प्रयागराजमध्ये भाविकांची गर्दी प्रचंड वाढली असून, या भागात वाहतूक जाम झाली आहे. यमुना नदीवर झालेल्या पुलाचा रस्ता शनिवारी सकाळपासून वाहतूक तुंबल्याने बंद होता. संगमापर्यंत येणाऱ्या भाविकांना प्रचंड गर्दीमुळे अर्ध्या तासांचे अंतर कापण्यासाठी तब्बल चार तास लागत आहेत. दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत सुमारे ६० कोटी लोकांनी संगमात अमृतस्नान केले असून, १३ जानेवारीपासून आतापर्यंत देशातील जवळपास निम्म्या लोकसंख्येने यंदाच्या कुंभमेळ्यात संगम स्नान केले आहे.

१४४ वर्षांनंतर आलेल्या या महाकुंभ मेळ्याचे आता अवघे चार दिवस उरले आहेत. यामुळे भाविकांची गर्दी वाढली असून, शहरात येणाऱ्या सर्व बाहेरून येणारी वाहने थांबवली जात आहेत. 

बाहेरून ५८ हजारांहून अधिक वाहनांचे आगमन
शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंतच प्रयागराजमध्ये बाहेरून ५८ हजार वाहने आली होती. या सर्व वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसह भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. यासाठी जागोजागी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.

महाकुंभ अपडेट् स
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले. महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तिघांना अटक.
महिलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर विकणाऱ्या ११ चॅनल्सविरुद्ध गुन्हे दाखल.
अशाच आक्षेपार्ह क्लिपबद्दल १५ अकाऊंटविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

शेवटच्या दिवशी विक्रम मोडणार
२६ फेब्रुवारी रोजी महाकुंभमध्ये शेवटचे अमृतस्नान असून, या दिवशी भाविकांच्या संख्येचा नवा विक्रम प्रस्थापित होईल, अशी शक्यता आहे.

प्रमुख स्नानाचे दिवस व भाविकांची संख्या अशी :
१३ जानेवारी, पौष पौर्णिमा    १.७० कोटी 
१४ जानेवारी, मकर संक्रांत    ३.५० कोटी 
२९ जानेवारी, मौनी अमावास्या    ७.६४ कोटी 
३ फेब्रुवारी, वसंत पंचमी    २.५७ कोटी 
१२ फेब्रुवारी, माघी पौर्णिमा    २ कोटी 
 

Web Title: Mahakumbh for the final bath of Amritsnan; 60 crore devotees have taken the bath in Prayagraj so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.