"चेंगराचेंगरी झाली, आम्ही जमिनीवर पडलो, ४० मिनिटं लोक आमच्या अंगावरुन जात राहिले अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:06 IST2025-01-31T12:05:44+5:302025-01-31T12:06:10+5:30
अमृत स्नानापूर्वी बुधवारी महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत.

"चेंगराचेंगरी झाली, आम्ही जमिनीवर पडलो, ४० मिनिटं लोक आमच्या अंगावरुन जात राहिले अन्..."
मौनी अमावस्येच्या अमृत स्नानापूर्वी बुधवारी महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. चेंगराचेंगरीचे फोटो आणि व्हिडीओ खूपच भयावह आहेत. परंतु जेव्हा प्रत्यक्षदर्शींशी अनुभव सांगितला तेव्हा तो अंगावर काटा आणणारा आहे.
चेंगराचेंगरीत केवळ उत्तर प्रदेशच नाही तर इतर अनेक राज्यांतील लोक सहभागी आहेत. हरियाणातील दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटली आहे. यामध्ये ६० वर्षीय रामपती देवी यांचा मृत्यू झाला आहे. रामपती यांचे नातू नरेंद्र कुमार यांनी सांगितलं की, ते त्यांच्या आजी आणि गावातील इतर ६ लोकांसह महाकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी गेले होते.
नरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी दुपारी १-२ च्या सुमारास, आम्ही सर्वजण संगम परिसराजवळ पोहोचलो. प्रचंड गर्दी पाहून आम्ही पवित्र स्नान न करण्याचा निर्णय घेतला. जमावाने बॅरिकेड्स तोडले आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. आम्ही जमिनीवर पडलो आणि सुमारे ४० मिनिटं लोक आमच्या अंगावरून जात राहिले. मग एक रुग्णवाहिका आली आणि आम्हाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी माझ्या आजीला मृत घोषित केलं.
कृष्णा देवी आपल्या कुटुंबासह प्रयागराजला गेल्या होत्या. चेंगराचेंगरीत त्यांचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर सदस्य बचावले. चेंगराचेंगरीत अनेकांनी आपली आई, बहीण, वडील, भाऊ गमावले आहेत. तर खूप जण अजूनही बेपत्ता आहेत.