Narendra Giri: दिवंगत महंत नरेंद्र गिरींची खोली उघडली, ३ कोटी रोकडसह एवढं किलो सोन सापडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 04:36 PM2022-09-16T16:36:15+5:302022-09-16T16:44:55+5:30

नरेंद्र गिरी महाराजांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी (Anand Giri) याला अटकही केली होती

Mahant Narendra Giri's room was opened, so much 50kg gold was found along with 3 crore cash in prayagraj | Narendra Giri: दिवंगत महंत नरेंद्र गिरींची खोली उघडली, ३ कोटी रोकडसह एवढं किलो सोन सापडलं

Narendra Giri: दिवंगत महंत नरेंद्र गिरींची खोली उघडली, ३ कोटी रोकडसह एवढं किलो सोन सापडलं

googlenewsNext

प्रयागराज - आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Narendra Giri) यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात ही घटना घडली होती. त्यानंतर, आखाडा परिषेदतील संपत्तीचा वादही समोर आला होता. आता, त्यानंतर, या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून सीबीआय अधिकाऱ्यांनी गुरुवारी महंतांची सीली केलेली खोली उघडली. त्यामध्ये, मोठं घबाड सापडलं. 

नरेंद्र गिरी महाराजांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी (Anand Giri) याला अटकही केली होती. गिरी यांची आत्महत्या की हत्या हा वाद सुरु असताना आखाडा परिषदेतील संपत्तीचा वाद समोर आल्याने या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयचे पथक गुरुवारी प्रयागराज येथील बागंबरी मठात पोहोचले. महंत नरेंद्र गिरी यांची सील केलेली खोली सीबीआय पथक, पोलीस आणि दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महंतांच्या खोलीतून ३ कोटी रुपये रोख रक्कम आणि काही जमिनीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. 

५० किलो सोनं

पोलीस आणि दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महंत यांची बागंबरी मठातील खोली उघडण्यात आली. त्यामध्ये मोठं घबाड सापडलं असून तीन कोटी रुपये रोख, ५० किलो सोनं, हनुमानजींचा सोन्याचा मुकूट, काही दागिने, काही जमिनीची कागदपत्रे, १३ काडतुसं आणि सुमारे ९ क्विंटल देशी तूप सापडले. जे महंत बलवीर गिरी यांना सोपवण्यात आले आहे. मठाच्या मुख्य गेटजवळ असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महंत नरेंद्र गिरी यांची खोली आहे.

महंतांनी केला होता न्यायालयात अर्ज

बागंबरी मठाचे विद्यमान महंत बलवीर गिरी यांनी खोली सुरू उघडण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयच्या पथकाने गुरुवारी पोलीस आणि दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत खोली उघडली. खोलीतून सापडलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद तयार करण्यात आली. यासोबतच व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफीही करण्यात आली. दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कक्ष आता मठाचे विद्यमान महंत बलवीर गिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

दरम्यान, खाडा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) जिल्हा न्यायालयात आरोपी आनंद गिरीसह 3 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने आपल्या तपासात त्याच तथ्यांवर भर दिला आहे, ज्यावर यूपी पोलिसांनी सुरुवातीच्या तपासात सांगितले होते. महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूला सीबीआयने आत्महत्या मानले आहे. त्याचबरोबर आनंद गिरी, आध्या तिवारी आणि संदीप तिवारी यांच्यावर 306, 120बी कलम लावण्यात आले आहे
 

Web Title: Mahant Narendra Giri's room was opened, so much 50kg gold was found along with 3 crore cash in prayagraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.