महंत परमहंस दास यांचे बेमुदत उपोषण, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 13, 2020 01:50 PM2020-10-13T13:50:16+5:302020-10-13T13:57:20+5:30

मुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट करण्यात यावे. तसेच मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठवण्यात यावे आणि पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदूंना भारतात आणावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Ayodhya)

Mahant paramhans das sit on fasting untill declaring india as hindu nation | महंत परमहंस दास यांचे बेमुदत उपोषण, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी

महंत परमहंस दास यांचे बेमुदत उपोषण, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देमुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट करण्यात यावे. तसेच मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठवण्यात यावे - महंत परमहंस दास पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदूंना भारतात आणावे - महंत परमहंस दास 1 ऑक्टोबर 2018 रोजी ते अन्न आणि पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले होते.

अयोध्या - तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास हे सोमवारपासून बेमुदत उपोशणाला बसले आहेत. उपोषणाला बसत त्यांनी सरकारकडे भारतालाहिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही, तर मुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट करण्यात यावे. तसेच मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठवण्यात यावे आणि पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदूंनाभारतात आणावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. परमहंस दास यांनी यापूर्वीही राम जन्मभूमीसाठी अनेक दिवस बेमुदत उपोषण केले आहे.

कोण आहेत परमहंस दास -
परमहंस दास हे अयोध्येत राहतात. ते तपस्वी छावनीचे महंत आहेत. मुस्लिमांवरील वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. ऑक्टोबर 2018मध्ये संत परमहंस यांनी अनेक दिवस राम जन्मभूमीसाठी बेमुदत उपोषण केले होते. 1 ऑक्टोबर 2018 रोजी ते अन्न आणि पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले होते. प्रशासनानेही अनेक वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर उपोषणाच्या सातव्या दिवशी पोलिसांनी त्यांना बळजबरीनेच आजारपणाचा हवाला देत उचलले होते आणि पीजीआयमध्ये दाखल केले होते. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून आणि ज्यूस देऊन त्यांचे उपोषण संपवले होते.

चिता रचून आत्मदहन करण्याचीही केली होती घोषणा - 
परमहंस दास यांनी तपस्वी छावनी मंदिरात बाबर विचारधारा विध्वंस महायज्ञ करण्याचीही घोषणा केली होती. ते 6 डिसेंबरला दुपारी 12 वाजता आपली चिता तयार करून आत्मदहन करण्याच्या निर्णयावर ठाम होते. राम मंदिर उभारणीच्या मागणीसंदर्भात कसल्याही प्रकारचा निर्णय होत नसल्याने महंत परमहंस दास नाराज होते. मात्र, दोन दिवस आधीच परमहंस यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना, सीजीएम न्यायालयातही दाखल करण्यात आले होते. सीजीएम यांनी त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.

Web Title: Mahant paramhans das sit on fasting untill declaring india as hindu nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.