अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 03:35 PM2023-04-09T15:35:24+5:302023-04-09T15:37:34+5:30

Eknath Shinde PC: डॉक्टरेट मिळण्यावरून शिंदे म्हणाले, मी अगोदरच डॉक्टर होतो, म्हणून तर एवढे मोठे ऑपरेशन केले. यांना छोट्या मोठ्या गोळ्याच पुरेशा आहेत.

Maharashtra Bhavan in Ayodhya will be named after Balasaheb Thackeray; Big announcement of Eknath Shinde in Ayodhya Visit | अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

googlenewsNext

अयोध्येत राम मंदिर व्हावे, काश्मीरमध्ये ३७० कलम हटावे, मला एक दिवसासाठी पंतप्रधान बनवा असे बाळासाहेब म्हणाले होते. अमित शहा डॅशिंग गृहमंत्री आहेत. वाटले होते का ३७० कलम हटेल. पण हटवले. राम मंदिराचे काम प्रचंड वेगात सुरु आहे. मोदींच्या नेतृत्वात हे सारे घडत आहे असे सांगत अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

Eknath Shinde, Ravi Rana Ayodhya Visit: दौरा शिंदेंच्या शिवसेनेचा, रवी राणांनीच भाव खाल्ला; अयोध्येत नेमके काय घडलेय पहा...

शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यावेळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस, ठाकरे, अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस दिल्लीला महत्वाच्या बैठकीला जात होते, ते अयोध्येला आले. आम्ही खुलेआम आलोय, आम्हाला कोणाचाही आड पडदा नाही. आजची ही अयोध्या यात्रा आहे ही माझ्यासाठी फार परमोच्च आनंदाचा दिवस आहे. धनुष्यबाण मिळाल्यानंतर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, असे शिंदे म्हणाले. 

हिंदुत्वाची अॅलर्जी आणि बदनाम करण्याचे काम केले जातेय. सावरकरांचा अपमान केला. हिंदुत्व घराघरात पोहोचले तर आपले दुकान बंद होईल. त्याचे बंद होतच आलेले आहे. काहीजण परदेशात जाऊन देशाला बदनाम करण्याचे काम करतायत. जनता सुज्ञ आहे. आम्ही आमचे विचार पुढे नेत जाऊ, असेही शिंदे म्हणाले.  

आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही, वचन देतो; एकनाथ शिंदेंचा अयोध्येतून ठाकरेंवर बाण

डॉक्टरेट मिळण्यावरून शिंदे म्हणाले, मी अगोदरच डॉक्टर होतो, म्हणून तर एवढे मोठे ऑपरेशन केले. यांना छोट्या मोठ्या गोळ्याच पुरेशा आहेत. रावण राज्य म्हणणे हा रामांचा अपमान आहे. त्यांना मी सांगू इच्छितो, जेव्हा साधूंचे मॉब लिचिंग झाले तेव्हा कोणाचे सरकार होते. एका नेव्हल अधिकाऱ्याला मारले तेव्हा कोणाचे सरकार होते. राणा कुटुंबीयांना तुरुंगात टाकले तेव्हा कोणाचे सरकार होते. दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकला नाही. परवा पालघरमध्ये दोन साधुंचे हत्याकांड आपल्या लोकांनी वाचविले, हे रामाचे राज्य असल्याचा दावा शिंदे यांनी केला. 

आदित्य ठाकरेंचा जन्म झाल्यापूर्वीपासून मी शिवसेनेत काम करतोय, त्याच्यावर काय बोलू. अजित पवार उपमुख्यमंत्री होते, नेते आहेत. रामभक्तांना फालतुगिरी म्हणताय तुम्हाला रामभक्तच धडा शिकवतील, असे प्रत्यूत्तर शिंदे यांनी दिले. 
 

Web Title: Maharashtra Bhavan in Ayodhya will be named after Balasaheb Thackeray; Big announcement of Eknath Shinde in Ayodhya Visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.