महाराष्ट्र-बिहारमुळे 'असे' बदलणार राज्यसभेचे गणित; NDA चं बलाबल वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 09:36 AM2024-02-15T09:36:50+5:302024-02-15T09:37:19+5:30

एखाद्या राज्यातील एकापेक्षा अधिक जागांवर राज्यसभेची निवडणूक होत असल्यास मतांचा कोटा काढण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते

Maharashtra-Bihar will change Rajya Sabha Majority; The strength of NDA will increase | महाराष्ट्र-बिहारमुळे 'असे' बदलणार राज्यसभेचे गणित; NDA चं बलाबल वाढणार

महाराष्ट्र-बिहारमुळे 'असे' बदलणार राज्यसभेचे गणित; NDA चं बलाबल वाढणार

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहा जागांसह १५ राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे; परंतु नुकतेच महाराष्ट्र आणि बिहारमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यांमुळे राज्यसभेत एनडीएचे बलाबल वाढणार, हे निश्चित आहे.

भाजप रिक्त होणाऱ्या २८ जागांवर पुन्हा विजयी तर होणार हे स्पष्ट आहे. बिहारमध्ये सध्या ६ पैकी जेडीयू व राजदकडे प्रत्येकी दोन, तर भाजप व काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे. नव्या समीकरणामुळे भाजपला एका जागेचा फायदा, तर जदयुला एका जागेचा फटका बसू शकतो.

राज्यसभेसाठी मतांचे गणित कसे असते? 

एखाद्या राज्यातील एकापेक्षा अधिक जागांवर राज्यसभेची निवडणूक होत असल्यास मतांचा कोटा काढण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते.  विधानसभेच्या एकूण जागा गुणिले १०० करून त्यास निवडणूक होणाऱ्या जागांची संख्या अधिक १ या संख्येने भागितले जाते.

उदा. महाराष्ट्रात ६ जागांवर निवडणूक होणार आहे. त्यानुसार (२८८ (विधानसभेच्या एकूण जागा) X १०० ) / ६ १ = ४११४.२ (मतांचे मूल्य)

मतांच्या मूल्याला १०० ने भागून त्यावरून मतांचा कोटा काढला जातो. उदा. ४११४.२/१०० = ४१.१४ (ढोबळमानाने ४२) त्यानुसार महाराष्ट्रातील मतांचे मूल्य ४२ आहे.

ज्या राज्यामध्ये केवळ एकाच जागेसाठी निवडणूक होणार असल्यास, ज्या उमेदवाराला अधिक मते, तो विजयी ठरतो.

Web Title: Maharashtra-Bihar will change Rajya Sabha Majority; The strength of NDA will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.