शाब्बास पोरा! दृष्टिहिन असूनही बारावीच्या परिक्षेत धडाकेबाज कामगिरी; वाचा जिद्दीची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 06:28 PM2020-07-16T18:28:34+5:302020-07-16T18:38:03+5:30
दृष्टिहिन असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अभ्यास करणं, एखादा विषय समजून तसंच रोज कॉलेजला जाणं त्याला शक्य नव्हते.
कोरोनाच्या या संकटामुळे यंदा १२ वी चे निकाल लांबणीवर पडले. पण आज अखेर बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर झाला आणि सगळ्यांचीच प्रतिक्षा संपली. महाराष्ट्र राज्यातून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विविध स्तरातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी अपार कष्ट आणि मेहनत घेत शैक्षणिक जीवनाचा दुसरा टप्पा पार केला आहे. परिस्थितीवर मात करत घवघवीत यश मिळवत असलेल्या विद्यार्थ्यांची अनेक उदाहणं तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका होतकरून विद्यार्थ्यांच्या प्रवासाबद्दल सांगणार आहोत.
बालपणापासूनच अमरावतीत वास्तव्यास असलेल्या दिवांशू गावणकर हा उत्तम गुणांनी १२ वी उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे दिवांशू हा जन्मापासूनच दृष्टिहिन आहे. पण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आज त्याने बारावीमध्ये उत्तम यश मिळवलं आहे. शिक्षणासाठी दिवांशू पुण्यात राहत होता. दृष्टिहिन असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अभ्यास करणं, एखादा विषय समजून तसंच रोज कॉलेजला जाणं त्याला शक्य नव्हते.
ही बाब लक्षात घेऊनच अंध विद्यार्थ्यांसाठी व्हिडीओ क्लिप्स तयार केल्या जातात. ज्याद्वारे अंध मुलांना अभ्यास करता येईल. याच व्हिडीओ क्लिप्सचा अभ्यास करत दिवांशूने बारावीची परिक्षा उत्तीर्ण केली. ७४ टक्के गुणांनी दिवांशू उत्तीर्ण झाला आहे. इच्छा असल्यास आपण काहीही मिळवू शकतो हे दिवाशूंने दाखवून दिलेआहेत. ऑडिओ रेकॉर्डींग्स आणि रिलॅबसचे रेकॉर्डिंग ऐकूण त्याने बारावीचा अभ्यास मन लावून केला.
सतत एका जागी बसून ऑडीओ क्लिल्प ऐकून अभ्यास करणं हे खूपच कठीण काम होतं. तरीही परिस्थितीवर मात करत दिवांशूने जिद्दीने अभ्यास केला. या प्रवासात दिवाशूंला मित्रांनी खूप मदत केली. दिवांशूच्या यशामागे आई, बाबा, शिक्षक आणि मित्रांचा खारीचा वाटा आहे. 'माझ्या या कामगिरीमुळे आणि चांगल्या अभ्यासामुळे आज माझ्या आई-वडिलांचा आत्मविश्वास वाढला' असं मोठ्या अभिमानाने दिवांशूने सांगितले. खडतर स्थितीत परिक्षा उत्तीर्ण केलेल्या दिवांशूमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास
कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण