मार्केटिंगसाठी दिल्लीत महाराष्ट्र केंद्र

By admin | Published: November 15, 2014 02:10 AM2014-11-15T02:10:30+5:302014-11-15T02:10:30+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्रातील उद्योगांसह संस्कृतीचे ब्रॅण्डिंग व मार्केटिंग करण्यासाठी नवी दिल्लीत पूर्ण क्षमतेचे ‘महाराष्ट्र केंद्र’ स्थापण्याची घोषणा केली.

Maharashtra Center for Marketing | मार्केटिंगसाठी दिल्लीत महाराष्ट्र केंद्र

मार्केटिंगसाठी दिल्लीत महाराष्ट्र केंद्र

Next
नवी दिल्ली : महाराष्ट्र क्रमांक 1चे राज्य असूनही ब्रॅण्डिंग व मार्केटिंगमध्ये मागे पडलो असल्याची कबुली देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्रातील उद्योगांसह संस्कृतीचे ब्रॅण्डिंग व मार्केटिंग करण्यासाठी नवी दिल्लीत पूर्ण क्षमतेचे ‘महाराष्ट्र केंद्र’ स्थापण्याची घोषणा केली. 
येथील प्रगती मैदानावर 34व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी उद्योगमंत्री प्रकाश महेता, केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय उपस्थित होते. ‘महिला उद्योजकता’ ही यावर्षीच्या मेळाव्याची संकल्पना असल्याने मुंबई ते गडचिरोली या भागातील महिलांनी लहान-मोठे वस्तुनिर्मितीचे स्टॉल येथे लावले आहेत. त्या प्रत्येक स्टॉलला त्यांनी भेट दिली. 
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 97 महिला उद्योजिकांच्या कॉफिटेबल बुक, 16 हस्तकलांच्या पुस्तिकांचे तर महिला उद्योजिका नेमक्या कशी काम करतात, ते दाखविणा:या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. राज्याचे उद्योग धोरण सक्षम आहे. परंतु त्यामध्ये महिलांच्या औद्यागिक प्रगतीसाठी फार विशेष लक्ष घातलेले नाही. या पाश्र्व भूमीवर उद्योगांमध्ये महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
देशाच्या विविध राज्यांतील उद्योग, व्यापार, हस्तकला इत्यादींना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विविध देशांचा भारतासोबत व्यापार संबंध वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्या उद्योग व वाणिज्य मंत्रलयाच्या वतीने दरवर्षी 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. विविध राज्यांच्या दालनांमध्ये उद्योग, हस्तकला, पाक कला इत्यादी उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येते. 
महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जवाहरलाल नेहरु  पोर्ट ट्रस्ट, सिडको, एमसीइडी, एनआयएफटीसह राज्यातील मोठे उद्योग, लद्यु उद्योग आदींचे एकूण 75 गाळे दालनामध्ये आहेत. (विशेष प्रतिनिधी)
 
आठवलेंनी घेतली भेट
मुख्यमंत्री राजधानीत आल्याची माहिती मिळाल्यावर खासदार रामदास आठवले यांनी त्यांची मेळाव्यात भेट घेतली. पत्रकारांना आठवले यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या पक्षाला स्थान देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

 

Web Title: Maharashtra Center for Marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.