श्रीकांत शिंदेंनी घेतली नरेंद्र मोदींची भेट; गप्पा, खाऊ अन् टाळी, सोशल मीडियावर चर्चा, Photos
By मुकेश चव्हाण | Published: December 23, 2022 10:37 PM2022-12-23T22:37:14+5:302022-12-23T22:47:21+5:30
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
नवी दिल्ली: आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी श्रीकांत शिंदेंसोबत त्यांच्या पत्नी आणि मुलागा देखील उपस्थित होता. याबाबत श्रीकांत शिंदे यांनी स्वत: ट्विटरवर ट्विट करत माहिती दिली आहे.
श्रीकांत शिंदे ट्विट करत म्हणाले की, जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर मुलांमध्ये मिसळावे, त्यांच्या भावनांशी एकरूप व्हावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. जेव्हाजेव्हा बालकांच्या सहवासाची संधी मिळते तेव्हातेव्हा ते स्वतःलाही विसरतात, आजही असंच झालं, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची आज सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली, आणि माझा मुलगा रुद्रांशसोबत मोदीजींनी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधत त्याला आशीर्वाद दिले. नरेंद्र मोदी यांनी दिलेला खाऊचा रुद्रांशने देखील हास्यमुखाने आनंदाने स्विकार केला. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री मोदीजी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची देखील विचारपूस करित कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी ट्विटरद्वारे दिली.
जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर मुलांमध्ये मिसळावे,त्यांच्या भावनांशी एकरूप व्हावे”असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. जेव्हाजेव्हा बालकांच्या सहवासाची संधी मिळते तेव्हा ते स्वतःलाही विसरतात.
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) December 23, 2022
आजही असंच झालं!
मा.पंतप्रधान @narendramodi जी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली pic.twitter.com/0AArKUhN5i
दरम्यान, नरेंद्र मोदी हे अनेकदा लहान मुलांमध्ये रमलेले दिसून येतात. शैक्षणिक कार्यक्रम असो वा कुठला संवाद पंतप्रधान मुलांशी संवाद साधण्यावर भर देतात. याआधी खासदार धैर्यशील माने यांची कन्या आदिश्री देशील पंतप्रधानांना भेटली होती. त्यावेळी तिनं संसदेत अनेक दिग्गज नेत्यांशी भेटी घेत संवाद साधल्याचे पाहायला मिळाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"