महाराष्ट्र कोरडाच
By admin | Published: July 7, 2015 10:56 PM2015-07-07T22:56:09+5:302015-07-07T22:56:09+5:30
पुणे : गेल्या दहा दिवसांपूर्वी राज्यातून दडी मारलेला पाऊस अजूनही परतलेला नाही. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र कोरडा झाला आहे. आजही राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. पाऊस नसल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे चिंताग्रस्त झालेला शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. गेल्या २४ तासात चिपळूण, देवगड, कर्जत, खालापूर, पोलादपूर, सुधागड पाली, महाबळेश्वर आणि पुण्यातील पौड येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. त्याव्यतिरिक्त राज्यात कोठेही पाऊस पडला नाही. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र कोरडा झाला आहे. जून महिन्यात कोकण आणि विदर्भात पडलेल्या पावसामुळे ज्या नद्यांना पूर आला होता त्या नद्यांमधील पाणीही आता संपत आले आहे. कोकणात मात्र पावसाची प्रतीक्षा संपणार आहे. पुढील २४ तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. राज्याच्य
Next
प णे : गेल्या दहा दिवसांपूर्वी राज्यातून दडी मारलेला पाऊस अजूनही परतलेला नाही. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र कोरडा झाला आहे. आजही राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. पाऊस नसल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे चिंताग्रस्त झालेला शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. गेल्या २४ तासात चिपळूण, देवगड, कर्जत, खालापूर, पोलादपूर, सुधागड पाली, महाबळेश्वर आणि पुण्यातील पौड येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. त्याव्यतिरिक्त राज्यात कोठेही पाऊस पडला नाही. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र कोरडा झाला आहे. जून महिन्यात कोकण आणि विदर्भात पडलेल्या पावसामुळे ज्या नद्यांना पूर आला होता त्या नद्यांमधील पाणीही आता संपत आले आहे. कोकणात मात्र पावसाची प्रतीक्षा संपणार आहे. पुढील २४ तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. राज्याच्या इतर ठिकाणी मात्र हलका पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.---