Maharashtra Election 2019: महाराष्ट्राच्या निवडणुकीत १५७ कोटी जप्त; २0१४ च्या तुलनेत पाचपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:54 AM2019-10-22T01:54:07+5:302019-10-22T06:46:54+5:30
Maharashtra Election 2019: यावर्षी विधानसभा निवडणुकांमध्ये धनशक्तीचा मोठा वापर झाल्याचे दिसत आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : यावर्षी विधानसभा निवडणुकांमध्ये धनशक्तीचा मोठा वापर झाल्याचे दिसत आहे. या निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने १५७ मद्य, अंमली पदार्थ, शस्त्रे व मूल्यवान वस्तू व रोकड धरून १५७ कोटी रुपये हस्तगत केले. गेल्या म्हणजे २0१४ च्या तुलनेत ही रक्कम पाचपट आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीच्या प्रचार काळात ६0 कोटी ६९ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली. याशिवाय ३३.४0 कोटी रुपयांचे मद्य, १९ कोटी ५२ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ तसेच शस्त्रे जप्त करण्यात आली. याखेरीज ५३ कोटी ३२ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि सोेने-चांदीचे दागिनेही हस्तगत करण्यात आले.
महाराष्ट्रात २0१४ साली ३0 कोटी रुपये किंमतीची रोकड व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात, यासाठी आम्ही खास व्यवस्था ठेवली होती. मतदारांवर उमेदवारांनी प्रभाव वा दबाव टाकू नये, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. त्यासाठी राज्यात ११२ निरीक्षक नेमले होते. त्याशिवाय २९५ सहाय्यक निरीक्षक, १५६७ फिरती पथके, १६५८ दक्षता पथके नेमली होती.
याखेरीज ४७७ व्हिडीओ पथकेही सक्रिय होती. उमेदवारांचा रोजच्या रोज हिशेब पाहण्यासाठी २९५ पथके काम करीत होती. त्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे सा' घेण्यात आले. राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन केले होते.
हरयाणात २४.१७ कोटी जप्त
हरयाणामध्ये याच काळात ९.१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय ११ कोटींचे मद्य, ३. ९४ कोटींचे अमली पदार्थही ताब्यात घेण्यात आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत ८.१ कोटी रुपये किमतीची रोकड व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या.