महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंविरुद्ध टीका न करण्याचे नेत्यांना निर्देश, भाजपा नेतृत्वाच्या प्रवक्ते, मंत्र्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 04:41 AM2019-11-15T04:41:31+5:302019-11-15T04:43:25+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा इतरांविरुद्ध वैयक्तिक टीका न करण्याचे निर्देश भाजप नेतृत्वाने भाजप प्रवक्ते आणि मंत्र्यांसह भाजपच्या सर्व केंद्रीय नेत्यांना दिले आहेत.

Maharashtra Election 2019: Instructions to leaders not to criticize Uddhav Thackeray, BJP leadership spokespersons, suggestions to ministers | महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंविरुद्ध टीका न करण्याचे नेत्यांना निर्देश, भाजपा नेतृत्वाच्या प्रवक्ते, मंत्र्यांना सूचना

महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंविरुद्ध टीका न करण्याचे नेत्यांना निर्देश, भाजपा नेतृत्वाच्या प्रवक्ते, मंत्र्यांना सूचना

Next

हरीष गुप्ता 
नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा इतरांविरुद्ध वैयक्तिक टीका न करण्याचे निर्देश भाजप नेतृत्वाने भाजप प्रवक्ते आणि मंत्र्यांसह भाजपच्या सर्व केंद्रीय नेत्यांना दिले आहेत. ब्रिक्सच्या पूर्ण अधिवेशनासाठी पंतप्रधान ब्राझीलला रवाना होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या औपचारिक बैठकीत भाजप नेतृत्वाने उपरोक्त निर्णय घेतला. या विषयावर अमित शहा बोलतील आणि टीव्ही चॅनलमार्फत भाजपची भूमिका मांडतील, असा निर्णयही घेण्यात आला. महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर अलिप्तपणे लक्ष ठेवावे.
शिवसेनेने साथ सोडल्याने ‘हिंदुत्वाची’ धुरा आपल्याकडे घेण्यास भाजप कट्टरतावादी उत्साहित आहेत. नजीकच्या काळात कठोर मेहनतीने काम करून ठाणे-कोकण पट्ट्यात भाजप जम बसवू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
>शिवसेना-राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आपली भूमिका ठरवू द्यावी आणि त्यांनी आपल्या इच्छेनुसार सरकार चालवू द्यावे. येत्या एक-दोन महिन्यांत स्थिती काय वळण घेते, याची वाट पाहावी, असेही या बैठकीत असे ठरले.

Web Title: Maharashtra Election 2019: Instructions to leaders not to criticize Uddhav Thackeray, BJP leadership spokespersons, suggestions to ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.