कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा, अशोक गेहलोत यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 03:32 AM2019-11-24T03:32:45+5:302019-11-24T03:33:40+5:30
महाराष्ट्रात भाजपने घडवून आणलेल्या राजकीय घडामोडींचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला
जयपूर : महाराष्ट्रात भाजपने घडवून आणलेल्या राजकीय घडामोडींचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातून येणारा तपशील धक्कादायक आहे. राज्यपालांनी भाजपशी संगनमत करून देवेंद्र फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे.
सरकार स्थापना लोकशाहीविरोधी : आप
भाजपने केलेला प्रकार लोकशाहीविरोधी असून, त्यामुळे जनादेशाचा अनादर झाला आहे, असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते संजयसिंग यांनी सांगितले की, काळ्या रात्री केलेले हे कृत्य लोकशाहीच्या मर्यादांची हत्या करणारे आहे.
डाव्यांचे भाजपवर टीकास्त्र
भाकपचे सरचिटणीस डी. राजा यांनी म्हटले की, या प्रकरणात राज्यपालांची भूमिका संशयास्पद असून, राज्यपाल आणि राष्ट्रपती कार्यालयांचा गैरवापर झाला आहे.
महाराष्ट्रातील कृत्य घृणास्पद -द्रमुक
सत्ता बळकावण्यासाठी भाजपने केलेले कृत्य घृणास्पद आहे, अशी प्रतिक्रिया द्रमुकने दिली आहे. द्रमुकप्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी सांगितले की, महाराष्ट्रात भाजपने लोकशाहीचा खून केला आहे.