Maharashtra Government: निवडणुकीसाठी तयार राहा, भाजपचा फडणवीसांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 03:48 AM2019-11-27T03:48:41+5:302019-11-27T03:51:17+5:30
महाराष्ट्रात सत्ता राखण्याच्या खेळात अपेक्षित यश न आल्यानंतरही भाजपने राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच विश्वास टाकला आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता राखण्याच्या खेळात अपेक्षित यश न आल्यानंतरही भाजपने राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच विश्वास टाकला आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी फडणवीस यांना पुढील निवडणुकीसाठीच्या तयारीला लागण्यास सांगितले आहे.
पक्षाने त्यांच्यावर आपला विश्वास व्यक्त करून हे येऊ घातलेले कोणताही ताळमेळ नसलेले सरकार फार दिवस चालणार नाही त्यामुळे संघर्ष सुरूच ठेवावा लागेल, असे त्यांना सांगितले.
सूत्रांनुसार महाराष्ट्रात उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला याची माहिती देऊन खेद जाहीर करून म्हटले की, मी योजनेला अपेक्षित वळण देऊ शकलो नाही. त्यानंतर त्यांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ही तुमची चूक नाही, असे म्हटले.
अजित पवार जर आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत तर ती त्यांची चूक आहे. तुम्ही पुढील निवडणुकीसाठी कामाला लागले पाहिजे.
भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने म्हटले की, राज्यातील नियोजित सरकारला आधार नसून ते फार दिवस चालणार नाही. महाराष्ट्र राज्य भाजपला सांगण्यात आले आहे की, तिने तिचा उत्साह कमी होऊ देऊ नये. महाराष्ट्रात बनणार असलेल्या भाजपेतर सरकारच्या चुकीच्या लोकविरोधी धोरणांना घेऊन लोकांपर्यंत जाण्याचा कार्यक्र म सुरू केला जावा.
आम्हाला आशा आहे की येत्या काही दिवसांत देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट होऊ शकते. त्यानंतर राज्यासाठी वेगळ््या रणनीतीवर चर्चा व तिची अमलबजावणी केली जाईल.