Maharashtra Flood : पूरग्रस्त भागातील रस्ते दुरुस्तीला सुरूवात, गडकरींनी दिले 100 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 08:42 PM2021-08-05T20:42:51+5:302021-08-05T20:43:58+5:30
यासंदर्भात केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनाही त्यांनी कळवले होते. गडकरी यांनी या पूराची दखल घेत तात्काळ 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
नवी दिल्ली - राज्यातील विविध विभागात झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे. त्यात, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक रस्ते वाहून गेले आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही माहिती दिली होती. त्यानंतर, आता नितीन गडकरींनी मोठी घोषणा केली आहे.
राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक सुमारे 700 कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले असून, त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व नाशिक विभागाचा क्रम आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले होते. तसेच, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनाही त्यांनी कळवले होते. गडकरी यांनी या पूराची दखल घेत तात्काळ 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Immediate steps have been taken up to restore the roads affected by unprecedented rains in Konkan and Western Maharashtra. 100 Cr has been sanctioned in this regard. This includes 52 Cr for temporary restoration and 48 Cr for permanent restoration.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 5, 2021
कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच, या कामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात 52 कोटी रुपये तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि 48 कोटी रुपये कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहितीही गडकरी यांनी ट्विटरवरुन दिली.
Interruptions at Parshuram Ghat, Karul Ghat, Amba Ghat have also been cleared. Temporary restoration work are already initiated and permanent restoration works will also be taken on priority.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 5, 2021
पुरामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान
प्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते, 469 रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती तर 140 पूल व मोऱ्या पाण्याखाली गेले होते. अंतिम पाहणी अहवालात नुकसानाच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या नुकसानाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली होती.