महाराष्ट्राला मिळाले २१९ राष्ट्रीय महामार्ग, कामे लवकर होण्यासाठी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 06:17 AM2022-08-14T06:17:02+5:302022-08-14T06:18:03+5:30

National Highways : १८,०६३ किलोमीटर पैकी सर्वाधिक १,१७८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्याला मिळाले आहेत.

Maharashtra got 219 National Highways, efforts by Ministry of Road Transport and Highways to speed up the works | महाराष्ट्राला मिळाले २१९ राष्ट्रीय महामार्ग, कामे लवकर होण्यासाठी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून प्रयत्न

महाराष्ट्राला मिळाले २१९ राष्ट्रीय महामार्ग, कामे लवकर होण्यासाठी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून प्रयत्न

googlenewsNext

- हरिश गुप्ता

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नागपूर, रायगड, बुलडाणा, बीड, अहमदनगर आणि जालना या शहरांत राष्ट्रीय महामार्गांची सर्वाधिक कामे सुरू आहेत. महाराष्ट्राला २१९ राष्ट्रीय महामार्ग मिळाले असून, ३४ शहरांना जोडणाऱ्या या महामार्गांची लांबी १८,०६३ किलोमीटर आहे.
१८,०६३ किलोमीटर पैकी सर्वाधिक १,१७८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्याला मिळाले आहेत. त्याखालोखाल सांगली (१,१४० कि.मी.), पुणे (९०५ कि.मी.), नांदेड (८६० कि.मी.), अहमदनगर (८३५ कि.मी.) आणि नागपूर (७९४ कि.मी.) यांचा क्रमांक लागला. ६७५ किलोमीटरसह औरंगाबादला यात सिंहाचा वाटा मिळाला असून, जिल्ह्यातून सात राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ४६५ किलोमीटरचे ६ महामार्ग आहेत.
महामार्गांची कामे लवकर व्हावीत यासाठी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने विविध पावले उचलली आहेत. 

Web Title: Maharashtra got 219 National Highways, efforts by Ministry of Road Transport and Highways to speed up the works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.