Maharashtra Government: भाजपा सरकार पडल्यानंतर अमित शहा संतापले; शिवसेनेवर केली जहरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 03:37 PM2019-11-27T15:37:01+5:302019-11-27T19:09:16+5:30

Maharashtra News: तसेच निवडणुकीवेळी आमची शिवसेनेसोबत युती झाली होती. दोन्ही पक्षांना एकमेकांच्या मतदारांनी मतदान केलं.

Maharashtra Government: Amit Shah is angry after the fall of BJP government; criticism on Shiv Sena | Maharashtra Government: भाजपा सरकार पडल्यानंतर अमित शहा संतापले; शिवसेनेवर केली जहरी टीका 

Maharashtra Government: भाजपा सरकार पडल्यानंतर अमित शहा संतापले; शिवसेनेवर केली जहरी टीका 

googlenewsNext

मुंबई - राज्यातील भाजपा सरकार अवघ्या साडेतीन दिवसात पडल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा चांगलेच संतापले दिसले, जनादेशाचा अनादर करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. विचारधारा आणि युतीधर्माच्या विरोधात त्यांनी काम केलं आहे. शिवसेनेचा एकही आमदार असा नाही ज्यांनी त्यांच्या बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो लावून मतं मागितली नाही, आदित्य ठाकरेंनी तेचं केलं असं अमित शहांनी टोला लगावला. 

एका माध्यमाशी बोलताना अमित शहा म्हणाले की, आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप करतात. आम्ही कोणत्याही आमदारांना हॉटेलवर ठेवलं नाही, आमदारांना हॉटेलवर ठेवून एकमेकांशी हातमिळवणी करुन सरकार बनविणे म्हणजे भाजपाचा पराभव नाही. कोणत्या विचारधारेच्या बळावर हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप केले पण मुख्यमंत्रिपद देऊन आघाडीने सरकार बनविले, पद देऊन सरकार बनविणे हा घोडेबाजार नाही का? असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला. 

तसेच निवडणुकीवेळी आमची शिवसेनेसोबत युती झाली होती. दोन्ही पक्षांना एकमेकांच्या मतदारांनी मतदान केलं. आमच्या महायुतीला लोकांनी कौल दिला. जनादेश हा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता. अनेक प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशी घोषणा झाली होती. आम्ही मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही शब्द शिवसेनेला दिला नव्हता हे स्पष्ट करतो असं अमित शहांनी सांगितले. त्याचसोबत शिवसेनेने आपल्या विचारधारेशी तडजोड केली, सर्व मुद्द्यांवर आमची भूमिका स्पष्ट आहे. मात्र निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दर्शन करण्याचं नियोजन होतं. मग मुख्यमंत्री बनविण्यासाठी त्यांनी त्यांचा प्लॅन रद्द केला असा आरोप अमित शहांनी केला. 

दरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी 6.40 मिनिटांनी शिवाजी पार्कवर शपथ घेणार आहेत. त्यावेळी अनेक मान्यवर नेत्यांना या शपथविधीचं निमंत्रण देण्यात येणार आहे. केंद्रातील मंत्री आणि इतर राज्यातील मुख्यमंत्री यांनाही या शपथविधीचं निमंत्रण देणार असल्याचं कळतंय, महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंनी माझ्या मोठ्या भावाला भेटायला दिल्लीत जाईन असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. 
 

Web Title: Maharashtra Government: Amit Shah is angry after the fall of BJP government; criticism on Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.