जलसंवर्धन योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 13:16 IST2023-04-24T13:15:42+5:302023-04-24T13:16:15+5:30
राज्यातील ९९.७ टक्के म्हणजे ९६ हजार ७६७ जलसाठे सार्वजनिक, तर २९५ म्हणजे ०.३ टक्के खासगी मालकीची आहेत

जलसंवर्धन योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर
सुनील चावके
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्रात एकूण ९७ हजार ६२ पैकी ९६ हजार ३४३ म्हणजे ९९.३ टक्के जलसाठे ग्रामीण भागात, तर फक्त ७१९ म्हणजे ०.७ टक्के शहरी भागांमध्ये असल्याचे देशात प्रथमच करण्यात आलेल्या लहानमोठ्या जलसाठ्यांच्या गणनेतून स्पष्ट झाले.
राज्यातील ९९.७ टक्के म्हणजे ९६ हजार ७६७ जलसाठे सार्वजनिक, तर २९५ म्हणजे ०.३ टक्के खासगी मालकीची आहेत. जलसंवर्धनाच्या योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक पाणवठे आणि जलाशय पश्चिम बंगालमध्ये, सर्वाधिक तलाव आंध्र प्रदेशमध्ये, तर सर्वाधिक सरोवर तामिळनाडूमध्ये आहेत.
राज्यातील एकूण
९७ हजार ६२
जलसाठ्यांचे वर्गीकरण
९६,४८८
मनुष्यनिर्मित
५७४ नैसर्गिक
(५६५ ग्रामीण,
९ शहरी भागात)
सार्वजनिक मालकीच्या
९६,७६७ जलसाठ्यांचा तपशील
जलसंपदा खाते ५३.७%
पंचायत समित्या ४२.७%
इतर सरकारी संस्था २.३%
सहकारी संस्था १.२%
महापालिका व ०.१%
नगरपालिका
जलसाठ्यांचे
वापरानुसार वितरण
भूजल पुनर्भरण ७७.२%
पेयजल व घरगुती वापर १३%
सिंचन ८.३%
धार्मिक ०.१%
मनोरंजन ०.१%
इतर १.३%
एकूण जलसाठ्यांचा तपशील
जलसंवर्धन योजना, ९२.७ टक्के
पाझर तलाव व चेक डॅम
तलाव ३.९ टक्के
इतर जलसाठे १.७ टक्के
पाणवठे ०.९ टक्के
सरोवर ०.४ टक्के
जलाशय ०.४ टक्के
वापरात नसलेले जलसाठे
सुकलेले १९४
बांधकामाअधीन ७०
गाळ साचलेले १५७
दुरुस्तीपलीकडे १४९
नष्ट झालेले
क्षारयुक्त २
औद्योगिक सांडपाण्याने दूषित २६