महाराष्ट्र, कर्नाटक, एमपी, हरियाणा...; काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाच्या चर्चांना उधाण, लवकरच घोषणा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 05:11 IST2025-02-13T05:10:57+5:302025-02-13T05:11:21+5:30

काँग्रेस एकाच वेळी सर्व बदल करण्या ऐवजी अथवा बदलांची घोषणा करण्याऐवजी टप्प्या टप्प्याने बदल करेल. खरे तर, ओडिशा काँग्रेस अध्यक्ष पदावर वरिष्ठ नेते भक्त चरण दास यांची नियुक्ती करून पक्षाने याची सुरुवातही केली आहे...

Maharashtra, Karnataka, MP, Haryana Talks of major reshuffle in Congress will an announcement be made soon? | महाराष्ट्र, कर्नाटक, एमपी, हरियाणा...; काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाच्या चर्चांना उधाण, लवकरच घोषणा होणार?

महाराष्ट्र, कर्नाटक, एमपी, हरियाणा...; काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाच्या चर्चांना उधाण, लवकरच घोषणा होणार?

सध्या निवडणुकांतील पराभवाचा सामना करत असलेला काँग्रेस पक्ष, आपल्या संघटनेत मोठे बदल करण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यात यासंदर्भात एक बैठकही झाली आहे. लवकरच अनेक राज्यांचे अध्यक्ष आणि प्रभारी देखील बदलले जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती, प्रियंका गांधींना यांना कोणती भूमिका दिली जावी? यासंदर्भात. मात्र, संघटनेच्या सरचिटणीस पदात काही बदल होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. सूत्रांच्यामते या पदाच्या बाबतीत बदल होण्याची शक्यता कमीच आहे.

टप्प्या टप्प्याने केले जातील बदल - 
काँग्रेस एकाच वेळी शर्व बदल करण्या ऐवजी अथवा बदलांची घोषणा करण्याऐवजी टप्प्या-टप्प्याने बदल करेल. खरे तर, ओडिशा काँग्रेस अध्यक्ष पदावर वरिष्ठ नेते भक्त चरण दास यांची नियुक्ती करून पक्षाने याची सुरुवातही केली आहे. तसेच, मध्य प्रदेशातील तरुण आमदार विक्रांत भुरिया यांना पक्षाच्या आदिवासी विभागाचे प्रमुख बनवण्यात आले आहे.

बिहार निवडणुकीपूर्वी नव्या प्रभारींची नियुक्ती -
या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर, मोहन प्रकाश यांच्या जागी नव्या प्रभारीची नियुक्ती करण्याची काँग्रेसची योजना आहे. पक्षाच्या या नव्या टीममध्ये अशोक गेहलोत, भूपेश बघेल आणि दिग्विजय सिंह, यांसारखे वरिष्ठ नेते असण्याची शक्यता आहे. तसेच, कृष्णा अलावरू, वामशी रेड्डी, श्रीनिवास बीवी यांसारखे युवा चेहरे प्रभारी होऊ शकतात.

या राज्यांमध्ये संघटनात्मक बदलाची शक्यता -
नवे प्रदेश प्रभारी -
जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये नवे प्रभारी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.
नवे प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र, केरळ, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशसह किमान अर्धाडझन राज्यांमध्ये नए प्रदेशाध्यक्ष देखील नियुक्त केले जाऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, हरियाणामध्ये रणदीप सिंह सुरजेवाला यांना प्रदेश अध्यक्ष बनवले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

तत्पूर्वी, गेल्या वर्षात बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत पक्षात लवकरच काही संघटनात्मक बदल केले जातील, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते.

Web Title: Maharashtra, Karnataka, MP, Haryana Talks of major reshuffle in Congress will an announcement be made soon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.