"रेमडेसिवीरचा तुटवडा आणि भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय; हे राजकारण नाही तर काय?"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 11:36 AM2021-04-11T11:36:25+5:302021-04-11T11:41:05+5:30
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा सवाल, सध्या देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात आहे तुटवडा
"देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सूरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे हे राजकारण नाही तर काय आहे?," असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करुन भाजपाच्या गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत वाटपावर सवाल उपस्थित केला आहे.
"देशात रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे आणि सूरतमधील भाजप कार्यालयात ते मोफत वाटण्यात येत आहे. हा राजकीय तुटवडा आहे का?," असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा प्रश्न विचारला आहे.
देश में रेमदेसवीर दवा की किल्लत है और सूरत बीजेपी दफ्तर से मुफ्त बांटी जा रही है ।
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 11, 2021
क्या यह कमी रानीतिक है ? #कोरोना@drharshvardhan
काय आहे प्रकरण ?
देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे. गुजरातमध्येही रेमडेसिवीरची मोठी मागणी आहे, दरम्यान, गुजरातमधील भाजपच्या एका कार्यालयात हे इंजेक्शन मोफत देण्यात येत आहे. यावरून विरोधकांनी गुजरात सरकारला घेरलं आहे. दरम्यान, गुजरात भाजप अध्यक्ष सी.आर.पाटील यांनी भाजप कार्यालयातून ५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना बाधित लोकांच्या नातेवाईकांना देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. परंतु जेव्हा ही लस स्टॉकमध्ये नाही त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात भाजप कार्यालयातून ही कशी उपलब्ध झाली असा सवाल विरोधकांनी केला आहे. सूरतमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर रेमडेसिवीर इजेक्शन घेण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती समोर आली होती.