Maharashtra Political Crisis: तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय, फडणवीसांनाही होती कल्पना?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 10:05 AM2022-07-01T10:05:16+5:302022-07-01T10:24:42+5:30

Maharashtra Political Crisis: गेल्या १० दिवसांत महाराष्ट्रामध्ये घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर अखेर काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गुरुवारी दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली असली तरी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आधीच झाला होता, अशी माहिती समोर येत आहे.

Maharashtra Political Crisis: That was when the decision was taken to give the post of Chief Minister to Eknath Shinde, did Fadnavis also have an idea? | Maharashtra Political Crisis: तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय, फडणवीसांनाही होती कल्पना?

Maharashtra Political Crisis: तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय, फडणवीसांनाही होती कल्पना?

Next

नवी दिल्ली - गेल्या १० दिवसांत महाराष्ट्रामध्ये घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर अखेर काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपानेदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी न सोपवता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याने आणि सरकारमध्ये सहभागी होणार नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास भाग पाडल्याने आता त्याचीच चर्चा अधिक सुरू आहे. मात्र गुरुवारी दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली असली तरी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आधीच झाला होता, अशी माहिती समोर येत आहे.

काल दुपारी एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यपालांकडे जात सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि भाजपा त्यांना पाठिंबा देईल, अशी घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र आपण सरकारमध्ये आपण सहभागी होणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते. पण पक्षश्रेष्ठींनी दबाव आणल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय हा दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले होते. तेव्हा हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच हे सर्व नियोजित कार्यक्रमानुसार घडले होते.

दरम्यान, शपथग्रहण सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र असं काही नसेल असं विधान शिंदे गटामधील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे. ते म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. ते एवढे कुशल आहेत की, ते कुठल्याही पदावर काम करतील. देवेंद्र फडणवीस राज्यासाठी एका संपत्तीसारखे आहेत. जर ते त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी मंत्रालयात असतील तर तो एक चांगला निर्णय आहे, असे केसरकर म्हणाले.

दरम्यान, काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधत आणि ट्विट करत फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही असेच ट्विट केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणे फडणवीस यांना भाग पडले. 

Read in English

Web Title: Maharashtra Political Crisis: That was when the decision was taken to give the post of Chief Minister to Eknath Shinde, did Fadnavis also have an idea?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.