Breaking News: इंदूरहून अमळनेरला येणारी एसटी नर्मदा नदीत कोसळली; १२ प्रवाशांचे मृतदेह सापडले, अनेक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 11:48 AM2022-07-18T11:48:14+5:302022-07-18T11:48:32+5:30

ST Bus Accident in Madhya Pradesh: खलघाट संजय सेतू पुलावरून नियंत्रण गमावल्याने एसटी बस २५ फूट खोल असलेल्या पुराच्या पाण्याने भरलेल्या नदीपात्रात कोसळली.

Maharashtra ST Bus coming from Indore to Pune falls off Khalghat Sanjay Setu Narmada river in Madhya Pradesh; Bodies of 12 passengers were found | Breaking News: इंदूरहून अमळनेरला येणारी एसटी नर्मदा नदीत कोसळली; १२ प्रवाशांचे मृतदेह सापडले, अनेक बेपत्ता

Breaking News: इंदूरहून अमळनेरला येणारी एसटी नर्मदा नदीत कोसळली; १२ प्रवाशांचे मृतदेह सापडले, अनेक बेपत्ता

googlenewsNext

 मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे मोठा अपघात झाला आहे. महाराष्ट्राची एसटी बस इंदौरहून अमळनेरकडे येत होती, यावेळी ती पुलावरून नर्मदा नदीपात्रात कोसळली. यामध्ये १२ प्रवाशांचे मृतदेह सापडले असून १५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची एसटी बस आहे.

खलघाट संजय सेतू पुलावरून नियंत्रण गमावल्याने एसटी बस २५ फूट खोल असलेल्या पुराच्या पाण्याने भरलेल्या नदीपात्रात कोसळली. यानंतर तातडीने मदत कार्य सुरु करण्यात आले. अॅम्बुलन्सद्वारे धामनोद सरकारी हॉस्पिटलमध्ये जखमींना उपचारासाठी नेण्यात आले आहे. 30 ते 35 प्रवासी बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेला एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दुजोरा दिला.




घटनास्थळी पोलीस आणि गोताखोर प्रवाशांचा शोध घेत आहेत. NDRF ची टीमदेखील घटनास्थळी पोहोचलेली आहे. या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते असे सांगतिले जात आहे. यापैकी महाराष्ट्रातील किती याची आकडेवारी मिळू शकलेली नाही. 

सकाळी ही बस इंदूरहून निघाली, वाटेत खलघाटात ही बस नर्मदा नदीत कोसळली. एम.एच. -४० - ९८४८ असा या बसचा क्रमांक आहे. बसचालक सी.ई. पाटील व वाहक प्रकाश श्रावण चौधरी यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती अमळनेर आगार प्रमुख अर्चना भदाणे यांनी दिली.

Read in English

Web Title: Maharashtra ST Bus coming from Indore to Pune falls off Khalghat Sanjay Setu Narmada river in Madhya Pradesh; Bodies of 12 passengers were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.