रोजगारनिर्मितीत महाराष्ट्र अव्वल; देशभरात लाभार्थींची संख्या ६१ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 06:10 AM2018-08-02T06:10:42+5:302018-08-02T06:11:18+5:30

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेत (पीएमआरपीवाय) महाराष्ट्रातील जवळपास अकरा लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळाला असून, देशभरात या योजनेच्या लाभार्थींची संख्या ६१ लाख आहे.

Maharashtra tops in job creation; Number of beneficiaries in the country is 61 lakh | रोजगारनिर्मितीत महाराष्ट्र अव्वल; देशभरात लाभार्थींची संख्या ६१ लाख

रोजगारनिर्मितीत महाराष्ट्र अव्वल; देशभरात लाभार्थींची संख्या ६१ लाख

Next

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेत (पीएमआरपीवाय) महाराष्ट्रातील जवळपास अकरा लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळाला असून, देशभरात या योजनेच्या लाभार्थींची संख्या ६१ लाख आहे. यात महाराष्ट्र ११,०६,०८७ लाभर्थ्यांसह अग्रस्थानी आहे.
२०१६-१७ मध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाने विविध क्षेत्रांतील कंपन्या आणि सेवायोजकांना नवीन नोकरभरती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली होती. या योजनेत नवीन कर्मचाऱ्यांना रोजगार देणा-या सर्व कंपन्यांचे कर्मचारी भविष्य निर्वाह योजना (ईपीएस) आणि कर्मचारी भविष्य निधीतील (ईपीएफ) योगदान ( १२ टक्के किंवा अनुज्ञेय) सरकारी तिजोरीतून देण्याची ही योजना आहे. सर्व पात्र कंपन्या/सेवायोजक/नियोक्त्यांसाठी तीन वर्षे ही योजना लागू आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेतहत २६ जुलै २०१८ पर्यंत ६१ लाख १२ हजार ५२७ जणांना लाभ मिळाला आहे. मेक इन इंडिया आणि सरकारच्या अन्य योजनांसाठी पूरक म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती. विशेष सेवा, वस्त्रोद्योग, तयार कपडे, स्वच्छता, साफ-सफाई, इस्पितळ आणि हिºयांना पैलू पाडणे आदी क्षेत्रातील आस्थापनांचा या योजनेत समावेश आहे. जवळपास २५ क्षेत्रांचा या योजनेत समावेश आहे. या योजनेच्या लाभार्थींच्या संख्येत महाराष्टÑ देशात अग्रणी असून, गोवा शेवटच्या स्थानी आहे, अशी माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाने राज्यसभेत काँग्रेसचे कपिल सिबल यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला दिलेल्या उत्तरात दिली.

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचे राज्यनिहाय लाभार्थी
राज्य - लाभार्थी
महाराष्ट्र ११०६०८७
तामिळनाडू ७१००८८
कर्नाटक ५६९४३३
गुजरात ५६०८५३
हरियाणा ५१२३१७
आंध्र प्रदेश ४८८८६९
उत्तर प्रदेश ४४१९४५
दिल्ली ३७११२२
राजस्थान २३३३३१
मध्यप्रदेश १८१८२५
पश्चिम बंगाल १७८३९२
उत्तराखंड १५९०९७
केरळ १०८८१३
पंजाब १०६७६६
चंदीगड ८३०७३
हिमाचल प्रदेश ७२७४०
बिहार ७२९७०
ओडिशा ६६९४७
छत्तीसगढ ५९१६४
झारखंड १९५७८
आसाम ५०८३
गोवा ४९३४
एकूण ६११२५२७
(तेलंगणासह)

Web Title: Maharashtra tops in job creation; Number of beneficiaries in the country is 61 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.