विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 06:41 PM2024-11-23T18:41:45+5:302024-11-23T18:50:47+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, हे निकाल एनडीएच्या लोकाभिमुख धोरणांवर जनतेचा विश्वास दर्शवणारे आहेत. महाराष्ट्रात महायुती आघाडीला मिळालेले नेत्रदीपक यश आणि झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे यश, यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Development, good governance, Jai Maharashtra...! What did PM Modi say about the victory of the Grand Alliance in the Maharashtra Hemant soren also congratulated | विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन

विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुका, तसेच इतर राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत जनतेचे आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, हे निकाल एनडीएच्या लोकाभिमुख धोरणांवर जनतेचा विश्वास दर्शवणारे आहेत. महाराष्ट्रात महायुती आघाडीला मिळालेले नेत्रदीपक यश आणि झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे यश, यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विकास... सुशासन... जय महाराष्ट्र...!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला आहे. या विजायासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत, महाराष्ट्रातील जनतेचे, विशेषतः तरुण वर्गाचे आणि महिलांचे, या ऐतिहासिक विजयासाठी आभार मानले आहेत. एवढेच नाही, तर मी ग्वाही देतो की,  महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची युती सातत्याने काम करत राहील. जय महाराष्ट्र!

बघा लाइव्ह ब्लॉग : 
Watch Live Blog >>

झारखंडच्या जनतेचे आभार - 
झारखंड विधानसभेचेही चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. येथे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी 40 पेक्षाही अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर NDA 30 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. झारखंडच्या जनतेचे आभार मानत पीएम मोदींनी ट्विट केले की, "राज्यातील जनतेच्या समस्या उचलण्यासाठी आणि त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आम्ही सदैव अग्रेसर राहू." याच बरोबर, पंतप्रधान मोदी यांनी हेमंत सोरेन आणि त्यांच्या पक्षाचेही त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

एनडीएची कामगिरी आणि जनतेचा विश्वास -
पोटनिवडणुकीसंदर्भात ट्विट करत त्यांनी लिहिले, "एनडीएच्या लोकाभिमुख योजनाची चर्चा संपूर्ण देशभरात सुरू आहे. लोकांची स्वप्ने आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात आम्ही कुठलीही कसर सोडणार नाही." 

उत्तर प्रदेशातील नऊ विधानसभा जागांपैकी सात जागांवर आघाडी घेत भाजपने विरोधकांना कडवी टक्कर दिली आहे. तसेच, इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्येही एनडीएची कामगिरी प्रभावी ठरली आहे.

Web Title: maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Development, good governance, Jai Maharashtra...! What did PM Modi say about the victory of the Grand Alliance in the Maharashtra Hemant soren also congratulated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.