"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 01:03 PM2024-11-27T13:03:15+5:302024-11-27T13:08:14+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात राज्याला पुढे नेले. अभ्यासू, संयमी आणि लोककल्याणकारी योजना राबवणारे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्राला लाभावे असंही भाजपा खासदार अजित गोपछडे यांनी सांगितले.
नवी दिल्ली - ज्यांच्या जागा जास्त आल्यात. महायुतीत जनतेचा कौल सर्वाधिक जागा भाजपाला दिल्यात त्यामुळे देवेंद्र फडणवीसचमुख्यमंत्री व्हावेत. मागील वेळी जनतेनं आम्हाला मोठा भाऊ म्हणून कौल दिला होता तरीही आम्ही लहान भावाला सिंहासनावर बसवलं आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने प्रगती केली आहे. त्यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांनी काम केले आहे. मागच्यावेळी आम्ही त्यांना सिंहासनावर बसवलं आता त्यांनी मनाचं औदार्य दाखवावं आणि भाजपाचामुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी रस्ता मोकळा करावा असं विधान भाजपा खासदार अजित गोपछडे यांनी एकनाथ शिंदे यांना जुनी आठवण करून दिली आहे.
दिल्लीत पत्रकार परिषद घेत अजित गोपछडे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे जनतेतला माणूस आहे. रिक्षा चालवणारा व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री होते. ते कधीही आडमुठेपणा करत नाहीत. मी कधीही त्यांना भेटलो, माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न तातडीने सोडवतात. माझ्या मनात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. ते निश्चित देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मोठ्या मनाने स्वीकार करतील. विरोधकांना एवढी मोठी चपराक बसलीय, त्यांनी आत्मचिंतन करावे. विरोधकांना जनतेने स्थान दाखवलं आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतीत न बोलता झालेल्या पराभवाचे चिंतन करावे. जनतेचा कौल मान्य करावा असं त्यांनी म्हटलं.
तसेच राज्यात अतिशय चांगले वातावरण आहे. जनतेने आम्हाला कौल दिला आहे. जनतेच्या मनातील सरकार आलेले आहे. जनतेने सगळ्यात जास्त जागा भाजपाला दिल्यात. आमचा स्ट्राईक रेट ९९ टक्के आहे. त्यामुळे ज्याचा स्ट्राईक रेट मोठा त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही आग्रही आहोत. अनेकजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्याची प्रगती झाली. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात राज्याला पुढे नेले. अभ्यासू, संयमी आणि लोककल्याणकारी योजना राबवणारे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्राला लाभावे असंही भाजपा खासदार अजित गोपछडे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात अनेक घडामोडी घडत असताना प्रत्येक वेळी धावून जाणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणे हे त्यांचे नेतृत्व आहे. कोविड, दुष्काळ, वंचित घटकाचे प्रश्न सोडवणारे नेतृत्व फडणवीस आहेत. उपमुख्यमंत्रिपद कुणाला द्यावं हा शिवसेनेचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मी त्यात बोलणार नाही. ज्याच्या जागा जास्त आल्यात त्यांना मुख्यमंत्रिपद दिले जावे अशी मागणी भाजपा खासदार गोपछडे यांनी केली.