महाशिवरात्री
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:12+5:302015-02-18T00:13:12+5:30
धार्मिक वातावरणात साजरी झाली महाशिवरात्री
Next
ध र्मिक वातावरणात साजरी झाली महाशिवरात्रीमंदिरात उसळली भाविकांची गर्दी : ठिकठिकाणी अभिषेक, पूजा अन् जागरणनागपूर : महादेवाचे अतिशय प्राचीन आणि स्वयंभू मंदिर नागपुरात आहे. हे सर्व मंदिर भाविकांच्या श्रद्धेय असल्याने, महाशिवरात्रीचा भव्य उत्सव या मंदिरांमध्ये साजरा करण्यात आला. अभिषेक, पूजा, भजन, कीर्तन, जागरण, महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी दिसून आली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. भूतेश्वर मंदिर, गुजरनगरनागपुरातील सर्वात प्राचीन, ८०० वर्षाचा इतिहास असलेले भूतेश्वर शिवमंदिर जागृत देवस्थान आहे. स्मशानभूमीच्या परिसरात हे देवस्थान असल्याने याला भूतेश्वर हे नाव पडले आहे. या मंदिराप्रती भाविकांची श्रद्धा असल्याने, महाशिवरात्रीला सकाळपासूनच भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादाचेही वितरण करण्यात आले. कल्याणेश्वर मंदिर, तेलंगखेडीतेलंगखेडीचे शिवमंदिर प्राचीन मंदिर असून, शहरात प्रसिद्ध आहे. भोसल्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे स्वयंभू मंदिर असून, लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने, मोठ्या संख्येने भाविक आज दर्शनासाठी आले होते. सकाळी महाआरती करून, अभिषेक करण्यात आला. दिवसभर मृत्युंजय मंत्राचा जप सुरू होता. दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले होते. भाविकांची गर्दी लक्षात घेता, कुठलीही विपरीत घटना घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. मंगळवारी मध्यरात्री महानिशितकालमध्ये महापूजा होणार आहे. अर्धनारीनटेश्वर मंदिर, मोक्षधाममोक्षधाम घाटावरील अर्धनारीनटेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव धार्मिक वातावरणात साजरा झाला. महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली. १९७७ मध्ये मोक्षधाम घाटावर अर्धनारीनटेश्वराच्या मूर्तीची स्थापना झाली. तेव्हापासून महाशिवरात्रीचा भव्य उत्सव येथे साजरा होतो. दोन दिवसीय या उत्सवात विविध कार्यक्रम होतात. मंगळवारी सकाळी पूजा झाल्यानंतर भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्रीला जागरणाचा कार्यक्रम झाला. लहान मुले, महिलांनीही आज मोक्षधाम घाटावर जाऊन दर्शन घेतले. या उत्सवानिमित्त मोक्षधाम घाटाचे वातावरण धार्मिक झाले होते.