मोठी दुर्घटना! महाशिवरात्रीला झारखंडच्या बाबाधाम मंदिरात चेंगराचेंगरी; अनेक भाविक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 12:11 PM2022-03-01T12:11:16+5:302022-03-01T12:20:56+5:30

Mahashivratri 2022 : झारखंडमधील बाबाधाम मंदिरात प्रचंड गर्दी झाली आणि यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

mahashivratri 2022 deoghar baba temple is crowded by devotees on mahashivratri stampede occurred many injured | मोठी दुर्घटना! महाशिवरात्रीला झारखंडच्या बाबाधाम मंदिरात चेंगराचेंगरी; अनेक भाविक जखमी

फोटो - news18 hindi

Next

नवी दिल्ली - महाशिवरात्री (Mahashivratri) निमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. विविध मंदिरांत आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान झारखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील बाबाधाम मंदिरात प्रचंड गर्दी झाली आणि यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनेमुळे काही वेळ मंदिरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 

महाशिवरात्री निमित्त भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने केलेली व्यवस्था कोलमडली. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे दर्शन काऊंटरजवळ चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक पुरुष आणि महिला जखमी झाले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाने भाविकांवर लाठीचार्ज केला असल्याचं सांगण्यात येत आहे. हा गोंधळ बराच वेळ सुरू होता. पूजा आणि दर्शनासाठी आलेले बरकागावचे आमदार अंबा प्रसाद यांनाही जिल्हा प्रशासनाने सहकार्य केले नाही.

अंबा प्रसाद यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात

मंदिराच्या व्यवस्थापकाने आमदार अंबा प्रसाद यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आमदार अंबा प्रसाद जखमींना भेटण्यासाठी पोहोचल्या आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची तक्रार करण्यासाठी एसडीओकडे पोहचल्या तेव्हा त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आमदार अंबा प्रसाद यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत भाविकांची योग्य ती व्यवस्था केली नसल्याचं म्हटलं आहे. तसेच आमदार या नात्याने नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी मी देवघर येथे दाखल झाले.

"मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली नाही"

 एसडीओ दिनेश कुमार यादव आणि मंदिर व्यवस्थापक रमेश परिहर यांनी वाद घातल्याचाही आरोप आमदार अंबा प्रसाद यांनी केला आहे. आमदार अंबा प्रसाद यांनी या घटनेनंतर या प्रकरणाची मी वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार आहे. मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली नाही. प्रशासन केवळ व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींसाठी कार्यरत आहे. सर्वसामान्य भाविकांच्या समस्या कुणीही ऐकून घेत नाही असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: mahashivratri 2022 deoghar baba temple is crowded by devotees on mahashivratri stampede occurred many injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.