"आम आदमी पार्टीला 60 कोटी रुपये दिले", महाठग सुकेश चंद्रशेखरचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 02:50 PM2022-12-20T14:50:48+5:302022-12-20T14:51:45+5:30

sukesh chandrashekhar : 200 कोटींची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखरला आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले.

mahathug sukesh chandrashekhar said that he gave 60 crores to aam aadmi party | "आम आदमी पार्टीला 60 कोटी रुपये दिले", महाठग सुकेश चंद्रशेखरचा दावा

"आम आदमी पार्टीला 60 कोटी रुपये दिले", महाठग सुकेश चंद्रशेखरचा दावा

googlenewsNext

नवी दिल्ली : महाठग सुकेश चंद्रशेखरने आम आदमी पार्टीवर ( AAP) गंभीर आरोप केला आहे. दिल्लीतील कोर्टातून बाहेर पडताना सुकेश चंद्रशेखरने आम आदमी पार्टीला 60 कोटी रुपये दिल्याचा दावा केला. तसेच, सुकेश चंद्रशेखरने नायब राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातही हेच म्हटले आहे. दरम्यान, 200 कोटींची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखरला आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले.

पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांच्या कोर्टात आता 6 जानेवारीला आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याच्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तसेच, परदेशात जाण्याची परवानगी मागणाऱ्या अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या याचिकेवर कोर्ट 22 तारखेला सुनावणी करणार आहे. दरम्यान, महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून एकापाठोपाठ एक पत्रे आल्यानंतर हा संपूर्ण वाद सुरू झाला. 

सुकेश चंद्रशेखरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर राज्यसभेच्या एका जागेच्या बदल्यात 50 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर सुकेश चंद्रशेखरने अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्योगपतींना त्यांच्या पक्षाशी जोडून 500 कोटी रुपये गोळा केल्याचा आरोपही केला. त्या बदल्यात आम आदमी पार्टीकडून कर्नाटकात मोठ्या पदाची ऑफर दिल्याचा आरोप सुकेश चंद्रशेखरने केला.

2016 मधील एका डिनर पार्टीचा संदर्भ देत सुकेश चंद्रशेखर म्हणाला होता की, या पार्टीत अरविंद केजरीवाल देखील उपस्थित होते आणि त्यांच्यासोबत सत्येंद्र जैन देखील होते. हे पैसे आपण अरविंद केजरीवाल यांना कैलाश गेहलोत यांच्या असोला येथील फॉर्मवर दिल्याचे सुकेश चंद्रशेखरने सांगितले. याशिवाय, सुकेश चंद्रशेखरने असेही सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी 2017 मध्ये सत्येंद्र जैन यांच्याशी काळ्या रंगाच्या आयफोनवरून तिहार तुरुंगात बोलत होते.

Web Title: mahathug sukesh chandrashekhar said that he gave 60 crores to aam aadmi party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.