२000च्या नोटांवरून महात्मा गांधी गायब!

By admin | Published: January 6, 2017 01:56 AM2017-01-06T01:56:12+5:302017-01-06T01:56:12+5:30

एखादी नोट खरी आहे की बनावट यासाठी सर्वात आधी त्यावर महात्मा गांधी यांचे छायाचित्र आहे की नाही हे पाहिले जाते. मात्र मध्य प्रदेशमधील शेओपूर जिल्ह्यातील एका गावातील शेतकऱ्याला

Mahatma Gandhi disappeared from 2000 notes! | २000च्या नोटांवरून महात्मा गांधी गायब!

२000च्या नोटांवरून महात्मा गांधी गायब!

Next

भोपाळ : एखादी नोट खरी आहे की बनावट यासाठी सर्वात आधी त्यावर महात्मा गांधी यांचे छायाचित्र आहे की नाही हे पाहिले जाते. मात्र मध्य प्रदेशमधील शेओपूर जिल्ह्यातील एका गावातील शेतकऱ्याला स्टेट बँकेतून दोन हजार रुपयांच्या ज्या नोटा मिळाल्या, त्या पाहून तो आश्चर्यचकितच झाला. त्याला देण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नव्या करकरीत नोटांवर महात्मा गांधींचे छायाचित्रच नव्हते. नोटेवरून गांधीजी गायब झाल्याचे पाहताच, ती नोट बनावट असावी, अशी शंका त्याला आणि गावकऱ्यांना आली.
पण ही नोट घेऊन तो बँकेत पोहोचला, तेव्हा त्यांना बँक अधिकाऱ्याने जे सांगितले, ते एकून, त्याला धक्काच बसला. छपाईमधील ही चूक आहे आणि चुकीने गांधीजींचे छायाचित्र नोटांवर छापले गेलेले नाही. मात्र या नोटा बनावट नाहीत, असे स्टेट बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. अशा प्रकारच्या अनेक नोटा बाजारात असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र गांधीजींचे छायाचित्र नसलेल्या या नोटा बनावट आहेत, असे वाटल्याने त्या कोणीच स्वीकारल्या न जाण्याची शक्यता अधिक आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Mahatma Gandhi disappeared from 2000 notes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.