चित्रपटानंतर महात्मा गांधींना जगभरात ओळख मिळाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 02:52 PM2024-05-30T14:52:12+5:302024-05-30T14:53:44+5:30

"आपण ७५ वर्षांत काहीही केले नाही"

Mahatma Gandhi got worldwide recognition after the movie Prime Minister Narendra Modi | चित्रपटानंतर महात्मा गांधींना जगभरात ओळख मिळाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

चित्रपटानंतर महात्मा गांधींना जगभरात ओळख मिळाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: “राष्ट्रपिता महात्मा गांधींचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आपण ७५ वर्षांत काहीही केले नाही. त्यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला, तेव्हा जगभरात त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्यापूर्वी त्यांना कोणी ओळखत नव्हते,” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.

पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले, “महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्त्व होते. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षांत काहीही केले नाही.”

अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे

“जगभरात जर मार्टीन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांची स्वतंत्र ओळख आहे. महात्मा गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो. मात्र, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे,” असेही ते म्हणाले.

घुसखोरीमुळे सीमावर्ती भागात लोकसंख्या संरचना बदलत आहे

घुसखोरीमुळे पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातील लोकसंख्येची संरचना बदलत आहे, तर घुसखोर स्थानिक तरुणांसाठी असलेल्या संधी हिरावून घेत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काकद्वीप येथील प्रचारादरम्यान केला.

बंगालच्या सीमावर्ती भागातील लोकसंख्या बदलली जात आहे. टीएमसी धार्मिक छळ झालेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याच्या विरोधात आहे. ते सीएएला एवढा विरोध का करत आहेत? हे लोक (टीएमसी नेते) सीएएबद्दल खोटे का बोलत आहेत? बेकायदेशीर घुसखोर प. बंगालमध्ये स्थायिक व्हावेत यासाठी टीएमसी तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.

महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्यासाठी केवळ ‘संपूर्ण राज्यशास्त्र’च्या विद्यार्थ्यालाच चित्रपट पाहण्याची गरज पडली असेल.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते

ज्यांचे वैचारिक पूर्वज नथुराम गोडसेसह महात्मा गांधींच्या हत्येत सहभागी होते, ते बापूंनी दिलेल्या सत्याच्या मार्गावर कधीच चालू शकणार नाहीत. आता खोटेपणा आपला बाडबिस्तरा गुंडाळून निघून जाणार आहे.
- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Mahatma Gandhi got worldwide recognition after the movie Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.