महात्मा गांधी बहुत चतुर बनिया था - अमित शहा
By admin | Published: June 10, 2017 09:52 AM2017-06-10T09:52:55+5:302017-06-10T10:05:25+5:30
काँग्रेस हा तत्वांवर चालणारा पक्ष नाही. फक्त स्वातंत्र्यप्राप्तीच्या विशिष्ट उद्देशासाठी काँग्रेसची स्थापना झाली होती.
Next
ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 10 - काँग्रेसवर टीका करताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चतुर बनिया असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस हा तत्वांवर चालणारा पक्ष नाही. फक्त स्वातंत्र्यप्राप्तीच्या विशिष्ट उद्देशासाठी काँग्रेसची स्थापना झाली होती. महात्मा गांधी चतुर व्यापारी होते. (वो बहुत चतुर बनिया था) त्यांना काँग्रेसच्या अंधकारमय भविष्याची कल्पना होती. म्हणून त्यांनी काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता असे अमित शहा म्हणाले.
छत्तीसगडमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले. अमित शहा सध्या तीन दिवसीय छत्तीसगड दौ-यावर आहेत. पुढच्यावर्षी 2018 मध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीआधी पक्ष संघटना बळकट बनवण्यासाठी शहा छत्तीसगड दौ-यावर आले आहेत. काँग्रेस हे स्वातंत्र्यप्राप्तीचे एक साधन होते. सर्व विचारधारेचे डावे, उजवे, समाजवादी, कम्युनिस्ट स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्टय साध्य करण्यासाठी या चळवळीमध्ये सहभागी झाले होते.
काँग्रेस कुठल्या एका ठराविक विचारावर, कुठल्या एका सिद्धांतावर बनलेला पक्ष नाही. फक्त स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेसची स्थापना झाली होती. महात्मा गांधी एक चतुर व्यापारी होते. पुढे जाऊन काय होणार हे त्यांना माहिती होते. म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला. महात्मा गांधींनी काँग्रेस विसर्जित केली नाही पण आता काही लोक ते काम करत आहेत असा शहा म्हणाले. याउलट भाजपाचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. जे देशविरोधी घोषणा देणारा त्यांना आम्ही देशद्रोही म्हणणार असे शहा म्हणाले.