महात्मा गांधींचे नातू कानू गांधी यांचं निधन
By Admin | Published: November 7, 2016 09:37 PM2016-11-07T21:37:11+5:302016-11-07T21:37:11+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू कानू गांधी यांचं सोमवारी संध्याकाळी प्रदिर्घ आजाराने निधन झालं. अनेक दिवसांपासून ते सुरतमध्ये खासगी रूग्णालयात उपचार घेत होते.
>ऑनलाइन लोकमत
सुरत, दि. 7- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू कानू गांधी यांचं सोमवारी संध्याकाळी प्रदिर्घ आजाराने निधन झालं. अनेक दिवसांपासून ते सुरतमध्ये खासगी रूग्णालयात उपचार घेत होते. ते 87 वर्षांचे होते.
कानू गांधींनी अमेरिकेतील प्रतिष्ठित संस्था एमआयटीमधून शिक्षण घेतलं होतं तसेच ते नासामध्ये वैज्ञानिक होते. ते आणि त्यांची पत्नी दिल्लीच्या वृद्धाश्रमात राहत असल्याचं समोर आल्यावर कानू गांधी चर्चेत होते. त्यावेळी त्यांनी परिस्थितीला कोणालाही दोषी ठरवलं नव्हतं आणि आपण कोणाकडून मदत मागणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.