'इथे' ऐकायला मिळतील महात्मा गांधींच्या हृदयाचे ठोके; अनुयायांसाठी आगळी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 01:21 PM2018-10-01T13:21:07+5:302018-10-01T13:21:29+5:30

राजधानीतल्या राष्ट्रीय गांधी संग्रहालयात आता महात्मा गांधींच्या कृत्रिम हृदयाचे ठोके ऐकायला मिळणार आहेत.

Mahatma Gandhi's heartbeats to hear 'here' Visit to Followers | 'इथे' ऐकायला मिळतील महात्मा गांधींच्या हृदयाचे ठोके; अनुयायांसाठी आगळी भेट

'इथे' ऐकायला मिळतील महात्मा गांधींच्या हृदयाचे ठोके; अनुयायांसाठी आगळी भेट

googlenewsNext

नवी दिल्ली- राजधानीतल्या राष्ट्रीय गांधी संग्रहालयात आता महात्मा गांधींच्या कृत्रिम हृदयाचे ठोके ऐकायला मिळणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रीय गांधी संग्रहालय अनेक कार्यक्रमांचं आयोजन करणार आहेत. संग्रहालयाचे संचालक ए. अन्नामलाई काल म्हणाले होते, गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला जागतिक शांतीच्या थीमवर एक विशेष फोटो प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, एक डिजिटल मल्टिमीडिया किटही जारी केला जाईल. ज्यात महात्मा गांधींशी संबंधित व्हिडीओ आणि ऑडिओ असतील.

ते म्हणाले, आम्ही महात्मा गांधींच्या जीवनाच्या विविध स्तरांची ईसीजी मिळवली आहे आणि डिजिटल माध्यमाचा वापर करून कृत्रिमरीत्या त्यांच्या हृदयाचे ठोके तयार केले आहेत. ही लोकांसाठी फारच आकर्षक सुविधा आहे. डिजिटल मल्टिमीडिया किटच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या आठवणी विशेष संग्रही ठेवण्यात आल्या आहेत. हा महात्मा गांधींचा पूर्ण किट एक पेन ड्राइव्हमध्ये आहेत. ज्यात सहा गोष्टी आहेत. महत्त्वाची पुस्तके, ए. के. चेट्टियारद्वारेचं एक वृत्तचित्र, 100 खास फोटो, गांधीजींचा आवाज, त्यांच्या आश्रमाचा एक व्हर्च्युअल दौरा आणि त्यांच्या आवडीच्या भजनांचा समावेश आहे. 

Web Title: Mahatma Gandhi's heartbeats to hear 'here' Visit to Followers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.