महावितरण, तलाठी कार्यालयांत हेलपाटे
By admin | Published: November 15, 2015 09:13 PM2015-11-15T21:13:59+5:302015-11-15T21:13:59+5:30
अवसरी : आंबेगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनी व महसूल विभागाकडून सर्वसामान्य जनतेची कामे हेलपाटे मारून देखील होत नसल्याने तालुक्यातील प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Next
अ सरी : आंबेगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनी व महसूल विभागाकडून सर्वसामान्य जनतेची कामे हेलपाटे मारून देखील होत नसल्याने तालुक्यातील प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये लोकसंख्या वाढल्याने गावागावांमध्ये स्थानिक ग्रामस्थ नवीन घरे बांधत आहेत. विहिरी व बोअरवेल घेतली आहे. घरांसाठी, विहिरींसाठी विद्युत वितरण कंपनीकडे विद्युत पुरवठ्यासाठी सहा-सहा महिने अर्ज करूनही वीजजोड मिळत नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, असे लोक अधिकार्यांना टेबलाखालून पैसे देऊन वीजजोड घेतात. मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा ग्राहकांना सहा-सहा महिने हेलपाटे मारून देखील वीजजोड मिळत नाही. विद्युत वितरण कंपनीने नेमलेले ठेकेदार हे अधिकार्यांना जुमानत नसल्याने सर्वसामान्यांची कामे वेळेत होत नाहीत. जे ग्राहक जास्त पैसे देतील त्यांची कामे आठ दिवसांत होत असल्याचे पहावयास मिळत आहे.तालुक्यात महसूल विभागाची अशीच परिस्थिती असून हक्कसोड पत्र, वारसहक्क नोंद, जमीन खरेदी-विक्री यांची नोंद करण्यासाठी ४ ते ५ महिने तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून देखील तलाठी दखल घेत नाहीत. अर्जदाराने तलाठ्याला विचारले असता, मंडलाधिकारी सही करत नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. मंचर, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पारगाव आदी गावांतील गावामध्ये एजंटशिवाय सर्वसामान्यांची कामे होत नाही. मात्र वरील गावातील राजकीय पुढार्यांची कामे बिनापैशात एकाच दिवसात होत आहेत. तहसील कार्यालयात सहा महिन्यांपूर्वी नवीन रेशनकार्ड मिळण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी अर्ज केले. मात्र तहसील कार्यालयात रेशनकार्ड उपलब्ध नसल्याने घोडेगाव तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.तालुक्यात विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असे नेते असताना देखील सर्वसामान्य नागरिकांची कामे प्रशासकीय अधिकार्यांकडून होत नाही.