...तर काश्मीरचा पॅलेस्टाईन होईल, महेबूबा मुफ्ती पुन्हा बरळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 05:53 PM2019-04-04T17:53:26+5:302019-04-04T17:55:03+5:30
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यावरून पीडीपी नेत्या महेबूबा मुफ्ती पुन्हा एकदा बरळल्या आहेत.
श्रीनगर - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यावरून पीडीपी नेत्या महेबूबा मुफ्ती पुन्हा एकदा बरळल्या आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यास काश्मीरचे पॅलेस्टाईन होईल. तसेच भारत हा केवळ काश्मीरच्या भूमीवर कब्जा करणारा देश बनून राहील, अशी टीका महेबूबा मुफ्ती यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना महेबूबा मुफ्ती या भाजपावर हल्ला करण्याची कोणतीही संधीत सोडताना दिसत नाही आहेत. आज श्रीनगरमधील प्रचारसभेत त्या म्हणाल्या की,''अमित शहा साहेब महेबूबा मुफ्ती तुम्हाला सांगतेय की, ज्या दिवशी कलम 370 संपुष्टात येईल. त्या दिवशी तुम्ही केवळ काश्मीरवर कब्जा करणारी शक्ती म्हणून शिल्लक राहाल. सध्या ज्याप्रकारे इस्राइलने पॅलेस्टाईनवर कब्जा केलेला आहे. त्याचप्रकारे जम्मू काश्मीरवरही भारताचा केवळ कब्जा शिल्लक राहील.''
M Mufti: Amit Shah sahab, Mehbooba Mufti aap se keh rahi hai, jis din aap 370 ko khatam karoge, you will be an occupational force in Jammu & Kashmir, jis tarah Palestine pe Israel ka kabza hai usi tarah Jammu&Kashmir main Hindustan ka kabza hoga, agar aapne 370 ko khatam kiya. pic.twitter.com/wnYIWWYWzk
— ANI (@ANI) April 4, 2019
यापूर्वी बुधवारीही महेबूबा मुफ्ती यांनी कलम 370 हा प्रचाराचा मुद्दा बनवला होता. कलम 370 रद्द झाल्याच जम्मू काश्मीर भारताचा भाग राहणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. ''ज्या अटींवर जम्मू काश्मीर भारताचा एक भाग बनले जर त्याच अटी काढून घेणार असाल तर आम्हाला जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करावे लागेल. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी 2020 पर्यंत जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि अनुच्छेद 35 ए रद्द करण्याची घोषणा केली त्यावर प्रतिक्रिया देताना मुफ्ती यांनी हे वक्तव्य केले होते.