महेंद्रसिंह धोनीची १५ कोटींची फसवणूक, दिवाणी न्यायालयात खटला दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 08:32 AM2024-01-06T08:32:48+5:302024-01-06T08:33:17+5:30
कंपनी आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात २०१७ मध्ये करार झाला होता. करार करताना कंपनीने केलेल्या करारांचे पालन केले नाही, असा धोनीचा आरोप आहे. त्यामुळे त्याचे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनी आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात २०१७ मध्ये करार झाला होता. करार करताना कंपनीने केलेल्या करारांचे पालन केले नाही, असा धोनीचा आरोप आहे. त्यामुळे त्याचे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या दोन माजी व्यावसायिक भागीदारांवर १५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. त्याने रांचीच्या दिवाणी न्यायालयात अरका स्पोर्ट्स ॲण्ड मॅनेजमेंट लिमिटेडचे मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे.
कंपनी आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात २०१७ मध्ये करार झाला होता. करार करताना कंपनीने केलेल्या करारांचे पालन केले नाही, असा धोनीचा आरोप आहे. त्यामुळे त्याचे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
करारामध्ये अरका स्पोर्ट्स फ्रॅंचायझी फी भरणे आणि नफ्याची वाटणी करणे बंधनकारक होते, परंतु कंपनीने तसे केले नाही. महेंद्रसिंह धोनीने कंपनीला अनेक नोटिसा पाठवल्या, पण कंपनीने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही किंवा नफ्यातील वाटा ही दिला नाही. त्यानंतर धोनीने १५ ऑगस्ट २०२१ रोजी कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणला.
तोडगा न निघाल्याने...
nकंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वी धोनीने चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. त्यानंतरही कंपनीने कोणताही निर्णय न घेतल्याने आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे.