महेंद्रसिंग धोनीचे तीन मोबाईल गेले चोरीला
By Admin | Published: March 19, 2017 10:16 AM2017-03-19T10:16:21+5:302017-03-19T10:16:21+5:30
धोनीचे तीन मोबाईल चोरीला गेले असून फोनमध्ये बीसीसीआय आणि टीम इंडियाशी संबंधीत महत्त्वपूर्ण माहिती असल्याचे वृत्त आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या तीन मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दिल्लीतील हॉटेलमध्ये लागलेल्या आगीदरम्यान मोबाईल चोरीला गेले असून फोनमध्ये बीसीसीआय आणि टीम इंडियाशी संबंधीत महत्त्वपूर्ण माहिती असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शुक्रवारी विजय हजारे ट्रॉफीमधील सामन्यासाठी महेंद्रसिंग धोनी संघासोबत दिल्लीमध्ये आला होता. दिल्लीमधील पालम परिसरातील वेलकम हॉटेलमध्ये महेंद्रसिंग धोनी राहत होता. त्याच्यासोबत संघातील खेळाडूंचही याच हॉटेलमध्ये वास्तव्य होते.
शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली होती. धूर दिसताच धोनीने प्रसंगावधान दाखवत संघातील सर्व खेळाडूंना सुखरुप हॉटेलबाहेर काढण्यात मोलाची भूमिका निभावली. मात्र यादरम्यान चोरट्यांनी धोनीच्या मोबाईलवर डल्ला मारला. तीन मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार धोनीने पोलिसांकडे नोंदवली आहे. पोलिसांनीही गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासून बघितले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.