खासदार मोइत्रांचा संसद आयडी ४ ठिकाणांहून ऑपरेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 11:54 AM2023-11-25T11:54:30+5:302023-11-25T11:55:04+5:30

निवडणूक निकालावर हकालपट्टी अवलंबून

mahua Moitra's Parliament ID operates from 4 locations | खासदार मोइत्रांचा संसद आयडी ४ ठिकाणांहून ऑपरेट

खासदार मोइत्रांचा संसद आयडी ४ ठिकाणांहून ऑपरेट

हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचा संसदेचा अधिकृत लॉगिन आयडी केवळ दुबईतील व्यावसायिक मित्र दर्शन हिरानंदानी यांनाच शेअर केला नसून, त्याचबरोबर इतर ठिकाणीही शेअर केल्याचे समोर आले आहे. त्यांचे अकाउंट दुबईबरोबरच अमेरिका, बंगळुरू येथूनही ऑपरेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी त्यांनी कबूल केले होते की, लोकसभेत विचारले जाणारे प्रश्न टाइप करण्यासाठी हिरानंदानी यांच्या कार्यालयातील कोणीतरी त्यांना मदत करण्यासाठी हे अकाउंट दुबईतून ऑपरेट केले. संसद सदस्यांनी सहायक व कर्मचाऱ्यांना लॉगिन शेअर करू नयेत, असा कोणताही नियम नाही, असा दावाही त्यांनी केला होता. त्यांनी फक्त प्रश्न टाइप करण्यासाठी व्यावसायिक मित्राची मदत घेतली आणि ओटीपी त्यांच्या नियंत्रणात होता, असेही त्यांनी म्हटले होते.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने समितीला सांगितले की, मोइत्रांचे लॉगिन अमेरिका, बंगळुरू, कोलकाता व दुबईहूनही वापरण्यात आले.

लॉगिनबाबत नवे नियम 
nलॉगिन आयडी शेअर केल्याबद्दलच्या अपात्रतेच्या कारवाईसाठी संसदेच्या नैतिकता समितीने अहवाल लोकसभा अध्यक्षांना पाठवला आहे. 
nमोइत्रांच्या दाव्यांची दखल घेत लोकसभा सचिवालयाने नवे नियम जारी करून म्हटले आहे की, खासदारांना त्यांचे लॉगिन आयडी त्यांच्या सदस्यांसमवेतही शेअर करता येणार नाहीत.
nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महुआ मोइत्रा यांच्या हकालपट्टीबाबतचा निर्णय पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर अवलंबून असेल. 
nममता बॅनर्जी यांनी काल म्हटले होते की, या मुद्द्यावर महुआ मोइत्रांची हकालपट्टी केल्यास केंद्र सरकारवर हे बूमरँग होईल. 

 

Web Title: mahua Moitra's Parliament ID operates from 4 locations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.