महुआ मोइत्रांच्या अडचणीत वाढ, सीबीआयने कॅश फॉर क्वेरी प्रकरणी चौकशी सुरू केली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 08:24 PM2023-11-25T20:24:14+5:302023-11-25T20:25:01+5:30
टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार आहेत.
तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोइत्रा यांच्या अडचणीत वाढणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने लाचलुचपत प्रतिबंधक लोकपालच्या निर्देशानुसार खासदार महुआ मोइत्रा यांची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे, याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली.संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्या विरोधात लोकपालाकडे तक्रार केली होती.
४१ मजुरांना बाहेर काढण्यास अजून १ महिना लागणार? परदेशी तज्ज्ञांचा मोठा दावा, कारणही सांगितले
दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर आर्थिक फायद्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोपही केला आहे. लोकसभेची एथिक्स कमिटीही मोईत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करत आहे.
सीबीआयने प्राथमिक चौकशीची नोंद केली आहे. हे आरोप पूर्ण तपासणीसाठी योग्य आहेत की नाही हे शोधण्याच्या दिशेने पहिली कारवाई केली आहे. प्राथमिक तपासादरम्यान पुरेशी प्रथमदर्शनी माहिती आढळल्यास, सीबीआय त्याचे एफआयआरमध्ये रूपांतर करू शकते.
अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी भेटवस्तूंच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप दुबे यांनी केला होता. मोइत्रा यांनी या आरोपांचे खंडण केले आहे. यावर प्रत्युत्तर देताने मोइत्रा म्हणाल्या, अदानी समूहाच्या सौद्यांवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे मला लक्ष्य केले जात आहे.
सीबीआय तपासावर बोलताना खासदार मोईत्रा म्हणाल्या, सुनावणी होण्यापूर्वी अदानी यांच्याविरुद्ध इतरही अनेक प्रकरणे आहेत ज्यांची चौकशी व्हायला हवी. त्यानंतर तपास यंत्रणेला हवे असल्यास ते बूट मोजण्यासाठी येऊ शकतात, अशी टीकाही मोइत्रा यांनी केली.